Sugarcane Season : चालू हंगामात राज्यात ४४१ लाख टन ऊसाचं गाळप ; ८५ कारखान्यांकडून १०० % एफआरपी अदा

Sugarcane Crushing : चालू गाळप हंगामात राज्यातील २०२ साखर कारख्यान्यांनी ४४१.०१ लाख टन उसाचे गाळप केले आहे.
Sugarcane Harvesting
Sugarcane Harvesting Agrowon
Published on
Updated on

Pune News : चालू गाळप हंगामात राज्यातील २०२ साखर कारख्यान्यांनी ४४१.०१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गाळप केलेल्या ऊसाची एफआरपी मूल्य सुमारे १३ हजार ६४२ कोटी रुपये आहे.

यापैकी कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीपोटी १३ हजार ०५६ कोटी रुपये दिले आहेत. जे एकूण एफआरपीच्या ९६ टक्के असून अद्यापही कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५८६ कोटी रुपये थकित आहेत.

बिझनेस लाईनने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील ८५ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. तर, ५० साखर कारखान्यांनी ६० ते ८० टक्के एफआरपी दिली आहे. मात्र, ११७ कारखान्यांनी चालू हंगामाचे एफआरपी थकीत आहे. दरम्यान, कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करत आहेत.

Sugarcane Harvesting
Sugarcane Rate : उत्तर प्रदेश सरकारकडून ऊस दरात प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ

उत्पादनावर परिणाम होणार

कर्नाटक सीमेवरील काही कारखान्यांनी उस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना राज्यभर उसाची वाहतूक न करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातील उस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane Cutting : पाणीटंचाईच्या भीतीने ऊस तोडण्याची धडपड

पाणीसाठ्यात होत असलेली घट आणि वेळेवर ऊस तोडणी होत नसल्याने याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

ऊस टंचाईची चिंता नको

साखर कारखान्यांनी उसाच्या टंचाईची चिंता करण्याची गरज नाही. राज्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे ऊस पिकात ८ ते १० टक्क्यांची अनपेक्षित वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढल्याने त्याचा राज्यातील साखर उत्पादनावर सकारात्मक परिणाम होईल, असे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (व्हिस्मा) अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com