Lightning Strike : देशात वीज पडण्याच्या ४२८ घटना

IMD : चालू वर्षी मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून या दोन्ही हंगामांत देशात वीज पडण्याच्या ४२८ घटना घडल्या. त्यातील ४७ घटना महाराष्ट्रातील आहेत.
Lightning Strike
Lightning Strike Agrowon
Published on
Updated on

Pune News : चालू वर्षी मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून या दोन्ही हंगामांत देशात वीज पडण्याच्या ४२८ घटना घडल्या. त्यातील ४७ घटना महाराष्ट्रातील आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या विषयीचा अहवाल जाहीर केला आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून, अंतिम अहवाल तयार करण्यात येत आहे.

भारतात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशी माहिती ‘आयएमडी’ आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी’ या दोन्ही संस्थांच्या अहवालातून देण्यात आला आहे. वीज प्रपाताशिवाय पूर आणि अतिवृष्टीच्या सर्वाधिक ५४४ घटनांची नोंद झाली आहे. तसेच सुमारे ११४ घटना उष्णतेच्या लाटेच्या होत्या आणि दहा घटना वादळाच्या आहेत.

Lightning Strike
Weather News : राज्यात तापमानात घसरण सुरू

यंदा देशात वीज पडण्याच्या ४२८ घटना घडल्या असून, बिहार राज्यात सर्वाधिक ८५ वीज पडल्याच्या घडल्या आहेत. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशामध्ये ८१, झारखंड ६५ आणि महाराष्ट्र ४७ घटना घडल्या आहेत.

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक घटनांचा समावेश आहे, अशी माहिती त्यात नोंदविण्यात आली आहे. याशिवाय राज्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीच्या ६९ घटनांची दुसऱ्या क्रमांकावर नोंद झाली आहे, तर हिमाचल प्रदेशामध्ये या पावसाळ्यात अशा सर्वाधिक १२३ घटनांची नोंद झाली आहे.

Lightning Strike
IMD Forecast : महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया

शेतकऱ्यांवर वीज पडण्याची शक्यता जास्त असते. वीज पडण्याच्या घटनांचा अंदाज वर्तविण्यासाठी यंत्रणा असली, तरी त्यावर आणखी काम करण्याची गरज आहे. असे मत हवामान तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे. यासाठी ‘दामिनी’ नावाने ओळखले जाणारे एक विशेष अॅप देखील या अलर्टसाठी विकसित केले आहे. त्यात दिलेल्या सूचनांचे नियमित पालन केले जावे, असे आवाहन हवामान तज्ज्ञ वारंवार करत आहेत.

चालू वर्षी २०२३ मधील पावसाळ्यात घडलेल्या घटनांची आकडेवारी :

वीज प्रपात - ४७

पूर आणि अतिवृष्टी - ६९

उष्णतेच्या लाटा - तीन

वादळ - दोन

गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात वीज पडणे, पूर, अतिवृष्टी होणे, उष्णतेचा लाटा, वादळ अशा अनेक घटना घडत आहे. हवामानाचा अभ्यास केल्यास अनेक बदल झाल्याचे दिसून येते. त्यावर उपाय म्हणून काय करता येण्यासाठी त्याचा अभ्यास हवामान विभागाकडून केला जात आहे.
डॉ. कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, सीआरएस, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com