Bogus Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात ४२ हजार जणांनी उतरविला बोगस पीकविमा

Crop Insurance Scheme : सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार ०८६ शेतकऱ्यांनी ४७ हजार ११७ हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा बोगस विमा भरल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार ०८६ शेतकऱ्यांनी ४७ हजार ११७ हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा बोगस विमा भरल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी फळबाग नसतानाही एक हजार ९०० जणांनी बोगस विमा उतरविल्याचे दिसून आले आहे. मात्र, याबाबतचे क्षेत्र निश्‍चित होऊ शकले नाही. या बोगस विमा भरलेल्या क्षेत्राच्या विम्यापोटी संबंधित शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम राज्य सरकारकडून जप्त केली जाणार आहे.

राज्यात खरीप हंगामामध्ये कांदा पेरणी क्षेत्रापेक्षाही अधिक क्षेत्राचा विमा उतरविल्याचा संशय कृषी आयुक्त कार्यालयाला आला. त्यानंतर कृषी खात्याकडून शेतकरीनिहाय प्रत्यक्ष शेतात जाऊन तपासणी करण्यात आली. या तपासणीत सोलापूरसह राज्यभरात बनावट विमा भरल्याचे तपासणीतून उघड झाले आहे.

Crop Insurance
Bogus Crop Insurance : नाशिक जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी उतरविला बोगस पीकविमा

जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ९५३ शेतकऱ्यांनी ८५ हजार ७०७ हेक्टर कांदा क्षेत्रापोटी पीकविमा भरला होता. मात्र, जिल्ह्यात अंदाजे ३७ हजार २३० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी झाली होती. मात्र, तपासणीत ३५ हजार ४६३ शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेल्या २३ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर कांदा पीकच नसल्याचे उघड झाले आहे. तर चार ६२३ शेतकऱ्यांनी २४ हजार ७७ हेक्टर क्षेत्रासाठी भरलेला पीकविमा पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर भरल्याचेही तपासणीत दिसून आले आहे.

Crop Insurance
Bogus Crop Insurance : फळबाग नसतानाही उतरविला दोन हजार शेतकऱ्यांनी विमा

एक हजार ९०० शेतकऱ्यांकडे नाही फळबाग

राज्यात मागील काही वर्षांपासून फळबागा नसतानाही विमा भरल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महा-ई-सेवा केंद्रचालकांना हाताशी धरुन बोगस पीकविमा भरला जात आहे. कृषी आयुक्त कार्यालयाने केलेल्या तपासणीत केवळ कांदाच नव्हे तर फळबागांचाही बनावट विमा भरण्यात आल्याचा प्रकार सोलापूरसह राज्यात अनेक जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात मृग बहरात पाच हजार ५१९ जणांनी फळबागांपोटी विमा भरला होता. त्यापैकी एक हजार ९०० जणांकडे फळबागच नसल्याचे तपासणीतून उघडकीस आले आहे.

बोगस पीकविम्याची कृषी कार्यालयाच्या आदेशाने तपासणी करण्यात आली. त्यात कांदा पीक नसताना, कांदा पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक आणि फळबागा नसताना विमा भरल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे राज्य सरकार विम्यापोटीची रक्कम जप्त करणार आहे.
-शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com