Rajarambapu Cooperative Bank
Rajarambapu Cooperative BankAgrowon

Rajarambapu Cooperative Bank : राजारामबापू बँकेला ४१ कोटींचा नफा

पेठ (ता. वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेला गेल्या आर्थिक वर्षात ४१ कोटी ९९ लाखांचा ढोबळ नफा झाला. बँकेने याहीवर्षी निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले.
Published on

Sangli News : पेठ (ता. वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेला (Rajarambapu Cooperative Bank) गेल्या आर्थिक वर्षात ४१ कोटी ९९ लाखांचा ढोबळ नफा झाला. बँकेने याहीवर्षी निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले.

बँकेचे अध्यक्ष प्रा. श्‍यामराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ढोबळ नफ्यातून संशयित व बुडीत निधीसाठी अतिरिक्त १८ कोटी ६४ लाखांची तरतूद केली आहे, तर ७ कोटी ७० लाखांची आयकर तरतूद केली आहे. या तरतुदी वजा जाता बँकेला १४ कोटी १६ लाखांचा निव्वळ नफा झाला, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. पाटील म्हणाले, की ३१ मार्च रोजी बँकेकडे २२७० कोटी ७६ लाख रुपयांच्या ठेवी झाल्या आहेत. बँकेने १५२७ कोटी ८५ लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. बँकेचा ठेवीशी कर्जाचा रेशो ६७.२८ टक्के आहे.

बँकेचे भागभांडवल ५२ कोटी ८३ लाख रुपये आहे तर स्वनिधी ३२५ कोटी ३२ लाखांचा आहे. बँकेचा भांडवल पर्याप्तता निधी १४.५ टक्के आहे बँकेकडे एकूण ३९० कर्मचारी कार्यरत असून बँकेचा प्रतिसेवक व्यवसाय ९ कोटी ७४ लाख रुपयांचा झाला आहे.

Rajarambapu Cooperative Bank
Jayant Patil : राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील बिनविरोध

ते म्हणाले, की लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९८१ मध्ये शेतकरी, शेतमजूर, लघु उद्योजक, नोकरदार, व्यापारी तसेच समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेची स्थापना केली.

बापूंच्या पश्चात आमदार जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बँकेची प्रगती सुरू आहे. बँकेने शेतकऱ्यांसाठी शेती व शेतीपूरक मुदतीची कर्जे, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री शेतघर कर्ज योजना राबवली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याव्यतिरिक्त सोनेतारण, वैयक्तिक वापरासाठी चारचाकी, फ्लॅट खरेदी, घरबांधणी, डॉक्टरांच्यासाठी लागणारी मशिनरी, ॲम्बुलन्स खरेदी व हॉस्पिटल बांधकाम याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पात्र कर्जदारांना उद्योग व्यवसायासाठी, स्मॉल स्केल इंडस्ट्री, टेक्स्टाईल व्यवसाय, नवीन उद्योग व्यवसाय वाढीसाठी अत्यल्प व्याजदराने कर्ज दिले जातात.

या वेळी बँकेचे संचालक विजयराव यादव, संजय पाटील, डॉ. प्रकाश पाटील, जयकर गावडे, अनिल गायकवाड, प्राचार्य दीपा देशपांडे, बाबूराव हुबाले, सुनील वैद्य, उमाकांत कापसे, आर. ए. पाटील यांच्यासह अन्य संचालक, अधिकारी, व्यवस्थापक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com