Team Agrowon
तिसऱ्या टप्प्यातील आंबा, काजू बागांना उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत. आंब्यावर काळे डाग तर काजूचा मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
आंब्याला दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील तीन टप्प्यांत मोहर आला. दुसऱ्या टप्प्यातील मोहर फुलकिडीच्या विळख्यात सापडला, तर तिसऱ्या टप्प्यातील मोहराला लागलेल्या फळांना आता उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत.
फळगळ आणि फळांवर काळे डागदेखील काही ठिकाणी पडू लागले आहेत. का
काजूला पहिल्यांदाच या वर्षी तीन टप्प्यांत मोहर आला. नोव्हेंबरमध्ये काही झाडांना मोहर आला. त्यानंतर डिसेंबर आणि अखेरचा मोहर अलीकडे मार्चमध्ये आला.
काजूचा तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर आता कडक उन्हामुळे काळा पडू लागला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात किरकोळ स्वरूपात काजू उत्पादन आले.
तिसऱ्या टप्प्यातील काजू उत्पादन शेतकऱ्यांना तारेल अशी अपेक्षा होती. परंतु मोहरच काळा पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
काजूचे उत्पादन यावर्षी ३० टक्केच येण्याचा अंदाज आहे. एप्रिल उजाडला तरी अजूनही बाजारपेठेत अपेक्षित काजू बीची आवक झालेली नाही. तरीही दरात सुधारणा झालेली नाही.