Poultry Farming News : नाशिकमधील नवीबेज शिवारातील ४०० कोंबड्यांचा मृत्यू

Chicken Death : नवीबेज शिवारात अज्ञात व्यक्तीने कुक्कुटपालनाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकले. त्यामुळे ४०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

Chicken Death In Nashik : नवीबेज शिवारात अज्ञात व्यक्तीने कुक्कुटपालनाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकले. त्यामुळे ४०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. तर अनेक कोंबड्या अस्वस्थ आहेत.

त्यामुळे पोल्ट्रीचे मालक सचिन रौंदळ यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संशयिताविरोधात कळवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Poultry Farming
Broiler Poultry Farming : ब्रॉयलर कोंबडीपालनासाठी शेडची उभारणी कशी असावी?

कळवण तालुक्यातील नवीबेज शिवारातील शेतकरी सचिन रामचंद्र रौंदळ यांची (गट नं.१९०/२ मध्ये) दोन कुक्कुट पक्षीगृहे आहेत. ते चार हजार ८८० कोंबडी पिल्लांचे संगोपन करीत होते. २ नंबरच्या शेडमधील गेटची जाळी तोडून अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या टाकीत रात्री विषारी औषध टाकले. त्यामुळे दोन हजार ४०० कोंबड्यांना विषबाधा झाली. त्यापैकी ४०० पक्षांचा मृत्यू झाला आहे.

कुक्कुटपालन व्यवसायाबरोबरच शेती व्यवसाय करून त्यावर रौंदळ कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. २००५ पासून करार पद्धतीने कुक्कुट पालन व्यवसाय सुरु केला आहे. सध्या दोन्ही पक्षीगृहात एका खासगी कंपनीकडून दोन शेडमधील ४ हजार ८८० पक्षांचे संगोपन सुरु होते. मात्र, या विषबाधेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com