Water Crisis : सिन्नर तालुक्यात टँकरच्या ४० फेऱ्या

Water Tanker : गेल्या वर्षी ८ मेस धुळवड येथील रामोशीवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाला होता.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Nashik News : तालुक्यात नोव्हेंबर २०२३ मध्येही सहा टँकरच्या २१ फेऱ्या सुरू होत्या. आता टँकरची संख्या नऊ झाली असून, तीन गावे आणि ४० वाड्यावस्त्यांवर टँकरच्या ४० फेऱ्या रोज होत आहेत. गेल्या वर्षी ८ मेस धुळवड येथील रामोशीवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाला होता.

५ ऑक्टोबरला पाऊस होऊन धरणात पाणी आल्याने हा टँकर बंद झाला. मागील वर्षी पाऊस न झाल्याने काही गावे आणि वाड्यांना टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली. सिन्नर तालक्यात पावसाची सरासरी ५५६ मिलिमीटर आहे. मात्र गेल्या वर्षी केवळ ३८८ मिलिमीटर पाऊस झाला.

Water Crisis
Water Crisis : जलसाठा घटू लागला गिरणातील आवर्तन थांबले

सरासरीच्या पाऊस केवळ ६६ टक्के होता. त्यामुळे अनेक गावे आणि वाड्यांना टंचाईच्या झळा बसल्या. पावसाळा संपल्यावर म्हणजे दिवसाआड पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तालुक्यातील अनेक मोठ्या गावांना हीच परिस्थिती आहे. अनेक गावांना दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

एप्रिल आणि मे महिन्यांत टँकरची संख्या आणि फेऱ्यांची संख्येचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केल्याने पिण्याचे टँकर सुरू करण्यास प्रशासनाला फारशी अडचण येत नाही.

मात्र एप्रिल आणि मेमध्ये सिन्नर तालुक्याला टंचाईच्या झळा जास्तच बसण्याची शक्यता आहे. सध्याही अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकर सुरू करावेत, यासाठी प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे टंचाईची धग या वर्षी जास्तच असणार आहे.

Water Crisis
Water Crisis : नगर जिल्ह्यात ३२ हजार लोकांची तहान १३ टँकरवर

मार्च एण्डमुळे वीजबिल थकबाकी भरण्याचे मोठे दिव्य सर्व पाणीयोजनांसमोर आहे, अन्यथा या योजनेतील गावांना पाणीटंचाईचा फटका बसू शकतो. सिन्नर तालुक्यात भोजापूर धरणातून कणकोरीसह पाच गावे, मनेगावसह १८ गावे या योजना सुरू आहेत, तर वावीसह ११ गावे, वडांगळीसह २७ गावे, बारागावपिंप्रीसह ७ गावे, नायगावसह १२ गावे आणि उंबरदरी धरणातून ठाणगावसह ५ गावे या ‘मजिप्रा’च्या पाणीयोजना राबविल्या आहेत.

दुष्काळी योजनांकडे नागरिकांच्या नजरा

यंदा केवळ ३८८ मिलिमीटर पाऊस पडल्याने सिन्नर तालुक्यातील १२८ गावांची पीक आणेवारी ५० पैशांच्या आत आली. त्यामुळे संपूर्ण सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांसह तालुकावासीयांना दुष्काळी योजनांचा फायदा केव्हा मिळणार, याकडे नजरा लागून आहेत.

कोणत्याही गावांचे किंवा वाड्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यास तातडीने प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. देवपूर, फर्दापूर या गावांसह दातलीच्या काही वाड्यांचे प्रस्ताव पाठविले असून, त्यांना मंजुरी मिळेल. आलेले प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले जात आहेत.
- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com