Sugarcane workers : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊसतोड कामगारांवर काळाची झडप; सीना नदीत ४ ऊसतोड कामगार बुडाले

Madha Taluka News : राज्यात दिवाळीच्या सणाला सुरूवात झाली असून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी माढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.
sugarcane workers drowned
sugarcane workers drowned Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. ऊसतोडीसाठी आलेल्या ४ ऊसतोड मजुरांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराव येथे घडली असून सध्या शोधकार्य सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माढा तालुक्यातील खैराव येथे मजुरांची पहिली टोळी काहीच दिवसांपूर्वी ऊस तोडणीसाठी दाखल झाली होती. ही टोळी यवतमाळ जिल्ह्यातील लसणा टेकडी येथील असून ती माढा तालुक्यातील जगदाळे वस्तीवर उतरली होती. यावेळी टोळीतील शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६), अजय महादेव मंगाम (वय २५), राजीव रामभाऊ गेडाम (वय २६) जवळच असणाऱ्या सीना नदीवर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील इतर सदस्यही होते. हे सर्व अंघोळी आणि कपडे धुण्यासाठी गेले होते.

शंकर शिवणकर पहिल्यांदा नदीत बुडाला. त्याला वाचवण्यासाठी प्रकाश धाबेकर गेला. तोही बुडू लागल्याने अजय मंगाम आणि राजीव गेडाम देखील पाण्यात उतरले. मात्र नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चौघेही पाण्यात बुडाले. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे. अद्याप कोणाचाही शोध लागेला नाही.

sugarcane workers drowned
Sugarcane Workers Precautions : मजुरांनी ऊस तोडणी करताना बिबट प्रवण क्षेत्रात काळजी घेण्याचे आवाहन

ऊसतोड मजुरांच्या मतदानाबाबत याचिका

दरम्यान बुधवारी (ता.३०) ऊसतोड मजुरांच्या मतदानावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका महाराष्ट्र श्रमिक ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेतर्फे राज्य अध्यक्ष जीवन हरिभाऊ राठोड यांनी दाखल केली आहे. यावर आता ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकेतून, राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश येथील सुमारे १२ ते १५ लाख ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात. ते महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा व तामिळनाडू राज्यांमध्ये जातात. मजूर स्थालांतरीत झाल्यास ते मतदानापासून वंचित राहतील. यासाठी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाने उपाययोजना कराव्या, असे याचिकेतून म्हटले आहे. या याचिकेत राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य साखर संघ, साखर आयुक्त व गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांना या प्रतिवादी करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com