
Chhatrapati Sambhajinagar Sowing News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी ६ लाख ७७ हजार ९०२ हेक्टरवर खरिपाची पेरणी (Kharif Sowing) प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली.
श्री देशमुख यांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गत पाच वर्षातील खरिपाच सरासरी क्षेत्र ६ लाख ७५ हजार १९० हेक्टर इतके आहे. दुसरीकडे गतवर्षीच्या खरीप हंगामात ६ लाख ७१ हजार ४२६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.
पाच वर्षातील सरासरी क्षेत्र व गतवर्षीच्या खरिपातील प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र लक्षात घेऊन येत्या खरीप हंगामासाठी ६ लाख ७७ हजार ९०२ हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्रस्तावित करण्यात आलेल्या खरीप क्षेत्रात ४३० हेक्टरवर ज्वारी, २२,४०७ हेक्टरवर बाजरी, १ लाख ७३ हजार ८१९ हेक्टरवर मका, ५५० हेक्टरवर इतर तृणधान्य, ४१ हजार ७५५ हेक्टरवर तूर, १२८५ हेक्टरवर मूग, ४४१० हेक्टरवर उडीद, १५० हेक्टरवर इतर कडधान्य, ६७८३ हेक्टरवर भुईमूग, १२० हेक्टरवर तीळ, १५३ हेक्टरवर सूर्यफूल, ३२,१९३ हेक्टरवर सोयाबीन, १०० हेक्टरवर इतर तेलबिया तर सर्वाधिक ३ लाख ८२ हजार १७७ हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
जालना येथे नुकतीच कृषी विभागाची विभागीय खरीप आढावा बैठक खरीप पूर्वतयारीच्या दृष्टीने कृषी आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्यावतीने खरीप हंगामाचे सविस्तर नियोजन साद करण्यात आले.
अशी आहे प्रस्तावित उत्पादकता (हेक्टरी किलोग्रॅममध्ये)
खरीप ज्वारी ७५०, बाजरी ९७२, मक्का २९५०, इतर तृणधान्य २३५, तूर ८७६, मूग ४९०, उडीद ५७२, इतर कडधान्य २७०, भुईमूग ९६६, तीळ ३२१, सूर्यफूल ५०४, सोयाबीन ११४८, इतर तेलबिया २३०, कपाशी ३४१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.