Solar Energy Project : लातुरात १७३ मेगावॉटचे ३६ सौरऊर्जा प्रकल्प सुरू

Solar Power : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व खात्रीचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण प्राधान्याने सौरऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे नेत आहे.
Solar Project Latur
Solar Project LaturAgrowon
Published on
Updated on

Latur News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व खात्रीचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण प्राधान्याने सौरऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे नेत आहे. डिसेंबर २०२४ ते आजतागायत जिल्ह्यात १७३ मेगावॉट निर्मिती क्षमतेचे एकूण ३६ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

या प्रकल्पांद्वारे तब्बल पन्नास हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. तर गेल्या तीन महिन्यात ८१ मेगावॉट क्षमतेचे १४ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून याप्रकल्पांद्वारे २१ हजार ६० शेतकऱ्यांचे दिवसा सिंचनाचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे.

Solar Project Latur
Solar Project : मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात आणखी ५ सौर ऊर्जा प्रकल्प सुरू

याद्वारे राज्यात एकूण १६ हजार मेगावॉट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत महावितरणच्या वीजउपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

Solar Project Latur
CM Solar Scheme: राज्यात १०७१ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारणार : फडणवीस

यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लातूर परिमंडळात जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

असे आहेत सौरऊर्जा प्रकल्प

एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात लातूर जिल्ह्यातील वलांडी (८ मेगावॉट), अहमदपूर (४ मेगावॉट), नगराळ (४ मेगावॉट), बेलकुंड (१० मेगावॉट), पळशी (८ मेगावॉट), नणंद (६ मेगावॉट), तोगरी (५ मेगावॉट), शिरूर ताजबंद (८ मेगावॉट), बुधोडा (५ मेगावॉट), अष्टा (५ मेगावॉट), कोळनूर (५ मेगावॉट), देवर्जन (६ मेगावॉट), लासोना (२ मेगावॉट) व नळगीर (५ मेगावॉट) या ३३/११ केव्ही उपकेंद्रांतर्गत एकूण ८१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.

यामुळे सदरील २४ उपकेंद्रातून निघणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांवरील २१ हजार ६० शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. दिवसा वीजपुरवठा होत असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com