Dam Water Stock : धरणांत नव्याने ३५.५४ टीएमसी पाण्याचा येवा

Water Storage : जून महिन्यात धरणक्षेत्रांत पावसाचा बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली
Water Storage
Water StorageAgrowon

Pune News : जून महिन्यात धरणक्षेत्रांत पावसाचा बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. एक जूनपासून धरणांत उपयुक्त ३५.५४ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. या काळात अनेक ठिकाणी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे धरणांतील आवक घटली आहे. त्यानंतर पुन्हा पाच ते सहा दिवसांपासून अधूनमधून सरी बरसत आहेत. आत्तापर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ११९७ मिलिमीटर, टेमघर ९११ मिलिमीटर, गुंजवणी धरण क्षेत्रात ६१८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.

Water Storage
Dam Water Stock : महिनाभरातच धरणांत १६.४१ टीएमसी पाण्याचा येवा

त्यामुळे नीरा, मुठा खोऱ्यातील धरणांतील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी मंगळवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत २.०५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

आत्तापर्यंत धरणात नव्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा दाखल झाल्याने पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात समस्या सुटली आहे. सध्या धरणांत एकूण उपयुक्त पाणीसाठा २८.३९ टीएमसी म्हणजेच १४ टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांत २८.१६ टीएमसी म्हणजेच १४.२० टक्के एवढा पाणीसाठा होता.

चालू वर्षी साधारणपणे सात जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक होता.

काही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. यात मुठा खोरे, नीरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यांतील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. धरणांत सुरुवातीला कमी आवक होती. परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर धरणांत नव्याने आवक सुरू झाली होती.

Water Storage
Water Project Stock : कोल्हापुरातील बहुतांश लघू प्रकल्‍प भरले

उजनीत ११.९२ टीएमसी पाण्याची आवक

नीरा आणि भीमा नदीच्या कार्यक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यात उजनी धरणक्षेत्रात २३७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. उजनी धरणात सर्वाधिक ११.९२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. यामुळे उजनीतील पाणीसाठा उणे २०.२३ टीएमसी म्हणजेच उणे ३७.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

एक ते ९ जून या कालावधीत धरणनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर ९११, वरसगाव ५१८, पानशेत ५१५, खडकवासला २०१, पवना ४६१, कासारसाई २३७, कळमोडी २६६, चासकमान २२३, भामा आसखेड १७२, आंध्रा २२१, वडिवळे ५५२, नाझरे २४१, गुंजवणी ६१८, भाटघर २४८, नीरा देवघर ३९६, वीर १४२, पिंपळगाव जोगे १४३, माणिकडोह १५८, येडगाव २२२, वडज ११५, डिंभे २१३, चिल्हेवाडी १६०, घोड २१९, विसापूर ११६, उजनी २३७, मुळशी ११९७,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com