Gokul dudh Sangh : 'गोकुळ'च्या पशुखाद्य कारखान्यात तब्बल ३५ लाखांचा घोटाळा, कारभारी लक्ष घालणार का?

Gokul Animal Feed Factory : पशुखाद्य वाहतुकीचे अंतर जादा दाखवून 'गोकुळ'च्या गडमुडशिंगी येथील पशुखाद्य कारखान्यात तब्बल ३५ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचे प्रकरणाने एकच खळबळ माजली आहे.
Gokul dudh Sangh
Gokul dudh Sanghagrowon

Kolhapur Gokul Dudh Sangh : पशुखाद्य वाहतुकीचे अंतर जादा दाखवून 'गोकुळ'च्या गडमुडशिंगी येथील पशुखाद्य कारखान्यात तब्बल ३५ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचे प्रकरणाने एकच खळबळ माजली आहे.

मागच्या आठ ते दहा दिवसांपासून संघात हे प्रकरण गाजत असून, त्यावर कारवाई करण्याऐवजी प्रकरण मिटवण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान याबाबत गोकुळ प्रशासनाकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

'गोकुळ'चा गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे अत्याधुनिक असा पशुखाद्य कारखाना आहे. या कारखान्यात तयार होणारे पशुखाद्य प्राथमिक दूध संस्थांना पाठवले जाते. त्यासाठी काही वाहतूक संस्थांना त्याचा ठेका दिला आहे, पण एक जबाबदार पदाधिकारी व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्याशी संबंधित वाहतूक संस्थेने किलोमीटरचे अंतर वाढवून बिले काढल्याचे उघडकीस आले आहे. त्यातून एक-दोन नव्हे तर तब्बल ३५ लाखांचा अपहार झाल्याचे बोलले जाते.

या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात आले आहे. चौकशीत या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठेकेदार व एका जबाबदार संचालकांचे नाव घेतले आहे. तरीही त्याच कर्मचाऱ्यांवर हे प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून अस्वस्थ झालेल्या या कर्मचाऱ्यानेच संचालकांना इशारा दिल्यानंतर हे प्रकरण नेत्यांपर्यंत पोहचू नये यासाठी ते दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Gokul dudh Sangh
Tigers in kolhapur forest : कोल्हापूरच्या जंगलात लवकरच दिसणार आता चंद्रपूरचे वाघ!

कानाडोळा पडेल महागात

या प्रकरणात नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शेतकरी संघात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घडली, पण आपला माणूस म्हणून प्रत्येकवेळी संबंधिताला सावरून घेण्यात आले. त्यातून संघाची आज काय अवस्था झाली हे सांगायला नको. म्हणूनच 'गोकुळ' मधील या प्रकरणाकडे नेत्यांनी कानाडोळा केल्यास त्याचे गंभीर परिणाम संघाला भोगावे लागतील. याचा विचार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणाची चौकशी होणार

या बातमीत काहीही तथ्य नाही. कुठून बातमी आली ते बघावे लागेल. सध्या संघाचे कार्यकारी संचालक व अन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. ते आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून खरेच असा प्रकार घडला का नाही, याचा शोध घेतला जाईल, - अरुण डोंगळे, अध्यक्ष, गोकुळ संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com