Satej Patil Vs Mahadevrao Mahadik : मागच्या ७ महिन्यांपूर्वी राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक पार पडली. दरम्यान यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात झालेल्या लढतीत गगनबावड्यातील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची जोरदार चर्चा झाली होती. राजाराम आणि डी. वाय. पाटील साखर कारखान्याची तुलना वेगवेगळ्या मुद्दांवर झाली होती यामध्ये दोन्ही कारखान्यांच्या एफआरपीच्या दराचीही जोरदार चर्चा रंगली होती.
दरम्यान दुर्गम भागात असलेल्या सतेज पाटील यांच्या साखर कारखान्याने ३२०० रुपये प्रतिटन दर दिला आहे तर महाडिक यांच्याकडे असलेल्या राजाराम साखर कारखान्याने ३१०० रुपये दर दिल्याने पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये सतेज पाटील गळीतास आलेल्या उसास प्रतिटन ३२०० रुपयाप्रमाणे बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. १५ नोव्हेंबरअखेर गळीतास आलेल्या ४३ हजार ३२९ टन उसाच्या बिलापोटी १३ कोटी ८६ लाख ५४ हजार रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.
आमदार पाटील म्हणाले, 'एफआरपी प्रतिटन ३०२० रुपये आहे. मात्र, संचालक मंडळाच्या धोरणानुसार चालू वर्षी गळीतास येणाऱ्या उसास प्रतिटन ३२०० रुपये एकरकमी देण्याचे ठरले आहे. त्यानुसार बिले आज जमा केली आहेत. चालू गळीत हंगामात १३ डिसेंबरअखेर १ लाख ७१ हजार ३५० टन उसाचे गाळप करून १ लाख ६३ हजार ५०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले असल्याचे ते म्हणाले.
कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून यावर्षी गाळप केलेल्या उसाचे प्रतिटन ३१०० रुपये दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे दिली.
पत्रात म्हटले आहे की, १६ नोव्हेंबरपासून राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला. दरम्यान ३० नोव्हेंबरपर्यंत ५० हजार १०६ टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या उसाचे प्रतिटन ३ हजार रुपये एकरकमी एफआरपी व जादाचे १०० असे एकूण ३ हजार १०० रुपये अशी एकूण १५ कोटी ५३ लाख रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत, असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी महादेवराव महाडिक यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.