Mulshi Dam : मुळशी धरणक्षेत्रात ३३ मिमी पाऊस

Monsoon Rain Update : मागील दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण असले, तरी पावसाचा फारसा जोर नाही. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.
Mulshi Dam Area
Mulshi Dam AreaAgrowon
Published on
Updated on

Pune News : मागील दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण असले, तरी पावसाचा फारसा जोर नाही. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरण क्षेत्रात ३३ मिलिमीटर पाऊस झाला.

तर, पवना, कळमोडी, आंध्रा, वडिवळे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिभे, चिल्हेवाडी, घोड, उजनी, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, कासारसाई, शेटफळ, नाझरे, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरण क्षेत्रांत पावसाचा अधूनमधून शिडकावा झाला असून उर्वरित धरण क्षेत्रात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

Mulshi Dam Area
Marathwada Rain : मराठवाड्यात धो-धो पावसाने शेतशिवार जलमय

जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने चांगलाच मुसळधार पाऊस कोसळल्याने धरणांतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. त्यातच नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस बरसला. यंदा एक जूनपासून ते २ सप्टेंबर या कालावधीत मुळशी धरणांच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक सहा हजार ३७२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Mulshi Dam Area
Rain Update : नगर जिल्ह्यातील बारा मंडलांत जोरदार पाऊस

गेल्या वर्षी याच काळात या घाटमाथ्यावर चार हजार ९८८ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर, याच काळात लोणावळा चार हजार ६९४, वळवण ४ हजार २४०, ठोकरवाडी २ हजार ७१९, शिरोटा ३ हजार ४२७, कुंडली साडे तीन हजार मिलिमीटर पाऊस पडला. टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ३ हजार ८५२ मिलिमीटर पाऊस पडला. तर गेल्या वर्षी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २ हजार १०३ मिलिमीटर पाऊस पडला होता.

याशिवाय वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तीन हजार १८० मिलिमीटर, पवना दोन हजार ९३२ मिलिमीटर, वरसगाव दोन हजार ५१९ मिलिमीटर, पानशेत २ हजार ४९३, गुंजवणी दोन हजार ६४८, नीरा देवघर दोन हजार २७५, कळमोडी एक हजार ४१४, आंध्रा १ हजार ३६४, कासारसाई एक हजार १७४, भामा आसखेड एक हजार २०१, भाटघर १ हजार १७८ मिलिमीटर पाऊस पडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com