Crop Insurance Compensation : नुकसान भरपाईपोटी ३३ कोटींवर पीकविमा मंजूर

गतवर्षीच्या (२०२२) पावसाळ्यात जून ते ऑक्टोंबर या कालावधीत सततचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) काढणी पश्चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टीग) या जोखीम बाबीअंतर्गंत खरीप हंगाम २०२२ मधील पीकनुकसानी बद्दल परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८८ हजार ८९१ शेतकऱ्यांना ३३ कोटी ७१ लाख १५ हजार ९३ रुपये एवढा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जात आहे. अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

२०२२ च्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६ लाख ७२ हजार ९१ विमाप्रस्ताव सादर करत सुमारे ४ लाख ३५ हजार हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार १७४ कोटी ३६ लाख ९४ हजार ८१६ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले होत.

त्यासाठी शेतकरी हिश्याचा ४८ कोटी २९ लाख ८० हजार ६३६ रुपये आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या हिश्याचा प्रत्येकी ११९ कोटी ४५ लाख ५९ हजार ३८२ रुपये असा एकूण २८७ कोटी २० लाख ९९ हजार ४०० रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला.

Crop Insurance
Crop Insurance : अवेळी पाऊस, गारपीट नुकसानीपासून विमा संरक्षण

गतवर्षीच्या (२०२२) पावसाळ्यात जून ते ऑक्टोंबर या कालावधीत सततचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जुलै -ऑगस्ट महिन्यातील प्रदीर्घ खंडामुळे उत्पादनात घट आली. त्यानंतर कापणी केलेल्या सोयाबीन तसेच अन्य पिकांचे नुकसान झाले.

पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलेमिटीज) या जोखीम बाबीअंतर्गत विमा दावे केले. त्यापैकी ३ लाख ५२ हजार ३८८ दावेदार शेतकऱ्यांना ७३ कोटी १४ लाख २२ हजार २३८ रुपये पीकविमा परतावा मंजूर झाला.

पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्केहून अधिक घट आल्यामुळे मध्य हंगाम प्रतिकूल स्थिती (मिड सिझन अॅडव्हर्सीटी) या जोखीम बाबी अंतर्गत सहा तालुक्यातील आठ मंडलातील ७३ हजार ८३० शेतकऱ्यांना ४० कोटी ७२ लाख ४० हजार ७३४ रुपये विमा परतावा मंजूर झाला.

सोयाबीन तसेच अन्य पिकांची काढणी केल्यानंतर झालेल्या पावसामुळे नुकसानीबद्दल पीकविमा भरपाईसाठी दावे दाखल केलेल्यांपैकी पात्र ८८ हजार ८९१ शेतकऱ्यांना ३३ कोटी ७१ लाख पीकविमा परतावा मंजूर झाला आहे.

Crop Insurance
Crop Damage : वातावरण बदलाचा बागायतदारांना फटका

आजवर १४७ कोटी ५८ लाखावर पीकविमा मंजूर.....

मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान या तीन जोखीम बाबी अंतर्गत मिळून जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार १०९ शेतकऱ्यांना १४७ कोटी ५८ लाख १५ हजार ६६ रुपये एवढा विमा परतावा मंजूर झाला आहे.

पीक उत्पादनातील घट या बाबी अंतर्गत पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे सोयाबीन उत्पादकेतत घट आलेल्या महातपुरी, पिंपळदरी (ता.गंगाखेड), बनवस (ता. पालम) या मंडलातील २८ हजारांवर शेतकऱ्यांना मंजूर पीकविमा परतावा अजून प्रलंबित असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com