Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांत ३२.५५ टक्के पाणीसाठा

June 2025 Water Level: राज्यात यंदा जून महिन्यातच दमदार पावसामुळे लहान-मोठ्या २९९७ धरणांत सरासरी ३२.५५ टक्के उपयुक्त जलसाठा निर्माण झाला आहे.
Water Dam
Water DamAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे २९९७ इतकी धरणे असून, या वर्षीच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याअखेर १८ जून अखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे ३२.५५ टक्के इतका म्हणजेच ४६५.६३ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिश्‍चंद्र चकोर यांनी दिली.

श्री. चकोर म्हणाले, की गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागात एकूण १७३ धरणे आहेत. त्यामध्ये आजमितीला ४७.३४ टीएमसी म्हणजेच ३६.१८ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिक विभागात ५३७ इतकी लहान-मोठी धरणे असून, त्यामध्ये ६६.६९ टीएमसी म्हणजेच ३१.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

Water Dam
Ujani Dam Water Stock: ‘उजनी’ची पाणीपातळी ५० टक्क्यांकडे

पुणे विभागात एकूण ७२० धरणे असून, त्यामध्ये आज १६७.९२ टीएमसी म्हणजेच ३०.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाडा विभागामध्ये एकूण ९२० धरणे असून, त्यामध्ये सुमारे ७९.०१२ टीएमसी म्हणजेच ३०.८५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागामध्ये २६४ धरणे असून, त्यामध्ये ५२.३४ टीएमसी म्हणजेच ३९.१८ टक्के आणि नागपूर विभागात ३८३ धरणे असून, या धरणांमध्ये ५२.२० टीएमसी म्हणजेच ३२.०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

Water Dam
Dam Water Storage : धरणांतील पाणीसाठा २४ टक्क्यांवर

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच धरणांमध्ये सुमारे २.९९ टीएमसी म्हणजेच १६.१८ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणांत सुमारे ४.४१ टीएमसी म्हणजेच ३६.८७ टक्के पाणीसाठा आहे. नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हटवणे धरणांत एकूण सुमारे ४.८३ टीएमसी म्हणजेच सरासरी ३६.७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

राज्यातील प्रमुख धरणातील एकूण पाणीसाठा

- उजनी ः ९२.९९ टीएमसी ७९.३१ टक्के (उपयुक्त ः ३१.६०० टीएमसी ५८.९८ टक्के)

- कोयना ः २५.७० टीएमसी २४.४२ टक्के (उपयुक्त ः २२.९७ टीएमसी २२.९४ टक्के

- जायकवाडी ः ४८.८० टीएमसी ४७.५० टक्के (उपयुक्त ः २२.७३ टीएमसी २९.६६ टक्के)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com