Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात २२१ उमेदवारांचे ३२४ अर्ज दाखल, आज होणार छाननी

Assembly Election Kolhapur : अखेरच्या दिवशी १३१ उमेदवारांनी १८८ अर्ज भरले, आज (ता. ३०) अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची ४ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रीया असणार आहे.
Kolhapur Assembly Election
Kolhapur Assembly Electionagrowon
Published on
Updated on

Kolhapur Politics : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा काल(ता.२९) अखेरच्या दिवसापर्यंत एकूण २२१ उमेदवारांचे ३२४ अर्ज दाखल करण्यात आले. अखेरच्या दिवशी १३१ उमेदवारांनी १८८ अर्ज भरले, आज (ता. ३०) अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची ४ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रीया असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीने होणाऱ्या लढतींमध्ये करवीरमधूनन शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार चंद्रदीप नरके, काँग्रेसचे राहुल पाटील, ‘दक्षिण’मधून आमदार ऋतुराज पाटील, तर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती, शिरोळमधून काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील, हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ. सुजित मिणचेकर आदींचा समावेश आहे. सर्व उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

मतदारसंघनिहाय अर्ज

चंदगड : मानसिंग खोराटे (जनसुराज्य शक्ती), परशराम पांडुरंग कुतरे (संभाजी ब्रिगेड), भाई नारायण रामू वाईंगडे (भारतीय कामगार पार्टी), अर्जुन मोराती धुंडगेकर (वंचित बहुजन आघाडी), गोपाळराव मोतीराम पाटील, मोहन प्रकाश पाटील, जावेद गुलाब अंकली, तुलसीदास लक्ष्मण जोशी, रमेश सत्तुप्पा कुतरे, नदाफ समीर महम्मदइसाक, प्रकाश राजाराम कागले, विलास शंकर नाईक, केदारी यल्लापा पाटील, राजेश रघुनाथ पाटील (सर्व उमेदवार अपक्ष)

राधानगरी : शहाजी रामकृष्ण देसाई, (संभाजी ब्रिगेड), पांडुरंग गणपती कांबळे (बहुजन समाज पार्टी), युवराज रामचंद्र येडुरे (मनसे), आशिष आनंदराव पाटील, कृष्णात पांडुरंग अरबुने, कुदरतुल्ला आदम लतिफ, सचिन विलास पाटील, इरफान अबुतालीब चाँद, चंद्रशेखर बळवंत पाटील (सर्व अपक्ष)

कोल्हापूर उत्तर : मालोजीराजे छत्रपती (काँग्रेस), अभिजित राऊत (मनसे), शाम भीमराव पाखरे (बहुजन समाज पार्टी), अस्लम बादशहा सय्यद (वंचित बहुजन आघाडी), रुपा प्रवीण वायदंडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट), वसंत दत्तोबा मुळीक, सुशांत संतोष दिघे, राजेश भरत लाटकर, सुरमंजरी राजेश लाटकर, विनय विलास शेळके, दिलीप मोहिते, शर्मिला शैलेश खरात (सर्व अपक्ष)

कोल्हापूर दक्षिण : विशाल केरू सागर (राष्ट्रीय समाज पक्ष), सलीम नूरमहंमद बागवान (भारतीय एकता पार्टी), अब्दुलहमिद शहाजान मिरशिकारी (वंचित बहुजन आघाडी), अरुण सोनवणे (स्वाभिमानी), ज्योती सुरेश आठवले (बहुजन समाज पार्टी), गिरीश बाळासाहेब पाटील, संदीप गुंडोपंत संकपाळ, शुभांगी सोनवणे, विजय शिंदे, माधुरी भिकाजी कांबळे, गिरीश बाळासाहेब पाटील, विराज शंकर शिंदे (सर्व उमेदवार अपक्ष)

Kolhapur Assembly Election
Ulhas Patil Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गटाला धक्का; दोन माजी आमदारांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

कागल : रोहन अनिल निर्मळे (मनसे), अभिषेक सुरेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), अशोक बापू शिवशरण (बहुजन समाज पार्टी), धनाजी रामचंद्र सेनापतीकर (वंचित बहुजन आघाडी), अशोक बापू शिवशरण, (बहुजन समाज पार्टी), ॲड. कृष्णाबाई दीपक चौगुले, साताप्पा शिवाजी कांबळे, सुधीर गंगाराम शिवाणे, विनायक अशोक चिखले, राजू बाबू कांबळे, प्रवीण विष्णू पाटील, अमन शिवाजी आवटे, हिंदुराव राजाराम अस्वले, अभिजित आनंदा तापेकर, विक्रम जयसिंग घाटगे, प्रकाश तुकाराम बेलवडे, याकुब कमरूद्दीन बेलीफ, बाबा शिवाजी कागलकर,

पन्हाळा-शाहूवाडी : शामला उत्तमकुमार सरदेसाई (बहुजन समाज पार्टी), भारत कासम देवळेकर (मनसे), विनय विष्णू कोरगावकर, विनय विजय चव्हाण, ॲड. दिनकर गणपती घोडे, धनाजी जगन्नाथ गुरव, संभाजी सीताराम कांबळे (सर्व अपक्ष).

हातकणंगले : अशोक आकाराम कांबळे (शिवसेना - शिंदे गट), अमर राजाराम शिंदे (बहुजन समाज पार्टी), राजहंस तुकाराम भुजिंगे (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), डॉ. क्रांती दिलीप सावंत (वंचित बहुजन आघाडी), गणेश विलास वाईकर (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट), ‍इंद्रजित आप्पासाहेब कांबळे, धनाजी लहू कराळे, वैभव शंकर कांबळे, उत्तम महादेव यशवंत, सार्थ सुजित मिणचेकर, सुरेश मनोहर कांबरे, शिवाजी महादेव आवळे, तुकाराम सभाजी कांबळे, स्वाती धनाजी कराळे, बाळासो आनंदा घाटगे, सतीश संभाजी कुरणे (सर्व अपक्ष)

इचलकरंजी : मदन सीताराम कारंडे, उदयसिंह मारुती पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट), रवी गजानन गोंदकर, प्रताप क्षमानंद पाटील (मनसे), रवी गजानन गोंदकर, (मनसे), रावसो गणपती निर्मळे (वंचित बहुजन पार्टी), शमशुद्दीन हिमायतुल्ला मोमीन (वंचित बहुजन आघाडी), डॉ. प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (देश जनहीत पार्टी), दत्तात्रय मारुती मांजरे (राष्ट्रीय मराठा पार्टी), अमर राजाराम शिंदे (बहुजन समाज पार्टी), संजय भोपाल बेडक्याळे (स्वाभिमानी पक्ष), सचिन किरण बेलेकर (राष्ट्रीय समाज पक्ष), विठ्ठल पुंडलिक चोपडे, शाहूगोंडा सातगोंडा पाटील, प्रदीप भीमसेन कांबळे, मुदस्सर मीरासाहेब समडोळे, इम्रान इस्माईल सनदी (सर्व अपक्ष)

शिरोळ : दादासो तुकाराम मोहिते (बहुजम समाज पार्टी), सचिन रामराव शिंदे (स्वाभिमानी), दादासो तुकाराम मोहिते (बहुजन समाज पार्टी), पांडुरंग भाऊ गायकवाड, धनाजी दरबू चूडमुंगे, स्वरूपा राजेंद्र पाटील, विजय जयसिंग भोजे, मुकुंद गणपती गावडे (सर्व अपक्ष)

करवीर : राजलक्ष्मी चंद्रदीप नरके (शिवसेना शिंदे गट), दयानंद मारुती कांबळे (वंचित बहुजन आघाडी), तेजस्विनी राहुल पाटील (काँग्रेस), हरी दत्तात्रय कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट), उत्तम पांडुरंग पाटील, अरविंद भिवा माने, असिफ शबाब मुजावर, माधुरी जाधव (सर्व अपक्ष)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com