Chilhewadi Dam Repair Funds: चिल्हेवाडी धरणांच्या दुरुस्तीसाठी ३१३ कोटींचा निधी

Dam Development: पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या चिल्हेवाडी धरणाचा अपूर्ण असलेल्या कालवा दुरुस्ती आणि पूर्णत्वासाठी शासनाने ३१३ कोटी ४८ लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Chilhewadi Dam
Chilhewadi DamAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या चिल्हेवाडी धरणाचा अपूर्ण असलेल्या कालवा दुरुस्ती आणि पूर्णत्वासाठी शासनाने ३१३ कोटी ४८ लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जलसंपदा विभागाचे अवर सचिव राजेश काळे यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे यांना निधी मंजूर झाल्याचे पत्र पाठवले असून, कालव्याच्या कामामुळे जुन्नर तालुक्यातील १६ हजार एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. १९९२ मध्ये गणपतराव फुलवडे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते

Chilhewadi Dam
Hatnur Dam : हतनूर धरणातील गाळामुळे जलसाठ्यावर परिणाम

त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांत जुन्नर तालुक्याला चार आमदार मिळाले; मात्र चिल्हेवाडी धरणाच्या कालव्याच्या अपूर्ण कामाबाबत कोणताही पाठपुरावा केला नाही. फुलवडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. चिल्हेवाडी धरणाचे काम पूर्ण होऊन २२ वर्षे पूर्ण झाली आहेत; मात्र अद्याप कालव्याचे काम केवळ ३८ किलोमीटरच झाले आहे.

Chilhewadi Dam
Almatti Dam : ‘अलमट्टी’ची उंची वाढविण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी

त्यामुळे पुढील कामाला गती देण्याची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या प्रस्तावाला शासन निर्णय जलसंपदा विभागाची ३१३ कोटी ४८ लाख रुपये रकमेस मंजुरी देण्यात आली. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात चिल्हेवाडी धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण व्हावे आणि त्याकरिता निधी द्यावा यासाठीचे पत्र फुलवडे यांनी दिले होते. सन २०२३-२४ वर्षांकरिता सुधारित मंजुरी देऊन ३० कोटी रक्कम मंजूर करण्यात आली.

उत्तर पट्टा बागायती होणार

चिल्हेवाडी धरण हे कुकडी प्रकल्पांतर्गत येत असून या धरणाच्या पाण्याचा उपयोग जुन्नर तालुक्यातील उत्तर प‌ट्ट्यातील कोरडवाहू जमिनीला होणार आहे. शेतकऱ्यांचे कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येऊन भविष्यकाळात शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com