Swapnil Shinde
भारतातील नद्यांच्या प्रदूषणाबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.
देशातील सुमारे ४६ टक्के नद्या प्रदूषित असल्याची माहिती ही समोर आली आहे.
देशातील २८ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ पैकी ३११ नद्या प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे. त्यात गंगा, यमुनेसह अनेक प्रमुख नद्यांचा समावेश आहे.
या प्रदुषित नद्यांमध्ये सर्वाधिक ५५ नद्या महाराष्ट्रातील आहेत
महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भिमा या नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत
त्यानंतर गोदावरी, पावना, कन्हान या नद्यांचा क्रमांक लागतो
हे प्रदुषण रोखण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.