Water Harvesting Work : जळगाव जिल्ह्यात वॉटर हार्वेस्टिंगची २९६ कामे

Water Crisis : वाढते तापमान, पर्यायाने पर्यावरणात होणारे बदल व वाढते काँक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. भूजल पातळीत होणारी घट हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
Rain Water Harvesting
Rain Water HarvestingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील दिवसेंदिवस घटत चाललेली भूजलपातळी त्यामुळे निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंगसाठी जळगाव जिल्हा परिषदेने ‘मिशन संजीवनी’ या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाभरात ७५ गावांना २९६ वॉटर हार्वेस्टिंगच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

वाढते तापमान, पर्यायाने पर्यावरणात होणारे बदल व वाढते काँक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. भूजल पातळीत होणारी घट हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे भीषण अशा पाणीटंचाईसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Rain Water Harvesting
Water Crisis : मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील नागरिकांनी मांडल्या पाण्याच्या अडचणी

भूजलपातळीत होणारी घट भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्हा परिषदेने ‘मिशन संजीवनी’ हे अभियान सुरू केले आहे.

Rain Water Harvesting
Yavatmal Water Crisis : आठ दिवसांत वाढले ४७ विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यातील ७५ गावांत कामे

मिशन संजीवनी हे अभियान जळगाव जिल्ह्यात सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ७५ गावांत २९६ कामांना मान्यता देण्यात आली आहे. या सर्वच्या सर्व कामांच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीतच मुरविण्याचा हा प्रयोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक

या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्हाभरात जिल्हा परिषदेअंतर्गत होणाऱ्या विविध इमारतीच्या बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय काम पूर्ण झाल्याचा पूर्णत्वाचा दाखला व संबंधित कंत्राटदाराचे देयके अदा करू नयेत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com