Sugar Factory Election : विलास सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चुरस वाढली

Co-Operative Sugar Mill Election : आठ विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी देत निवडणुकीत भाकरी अर्धीच फिरवली आहे. यातूनच त्यांच्या नेतृत्वाखालील विलासराव देशमुख सहकार पॅनेलच्या उमेदवारांसह २३ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत.
Sugar Factory Election
Sugar Factory Election Agrowon
Published on
Updated on

Latur News : निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी जुन्या पाच संचालकांचे पुनर्वसन करत आठ नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. आठ विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी देत निवडणुकीत भाकरी अर्धीच फिरवली आहे.

यातूनच त्यांच्या नेतृत्वाखालील विलासराव देशमुख सहकार पॅनेलच्या उमेदवारांसह २३ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी (ता. १७) अर्जाची छाननी होणार असून, मंगळवारी (ता. १८) वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर एक एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

Sugar Factory Election
Malegaon Sugar Factory : सर्वाधिक ऊसदर देणाऱ्या 'माळेगाव' विरुद्ध आंदोलन करणे कितपत योग्य

कारखान्याच्या निवडणुकीत सात मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली तरी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसातच बुधवारी (ता. १२) २३ तर गुरुवारी (ता. १३) पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर अमित देशमुख यांच्याकडून संचालकांसाठी उमेदवारी देताना अदलाबदल होण्याची चर्चा होती.

यातूनच निवडणुकीत देशमुख भाकरी फिरवणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी आठ विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देत देशमुखांनी भाकरी अर्धीच फिरवल्याचे दिसत आहे. उमेदवारी देताना त्यांनी अनुभवी आणि नवख्यांचा उत्तमरीतीने समावेश केला आहे. आतापर्यंतच्या संचालक मंडळातील पाच माजी संचालकांसह आठ नवीन कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे.

Sugar Factory Election
Malegaon Sugar Factory : सर्वाधिक ऊसदर देणाऱ्या 'माळेगाव' विरुद्ध आंदोलन करणे कितपत योग्य

यात अपेक्षेप्रमाणे सहकारी संस्था व बाभळगाव गटातून आमदार देशमुख यांनी अर्ज दाखल केले आहेत. यासोबत महिला गटातून विद्यमान अध्यक्षा वैशालीताई देशमुख व लता देशमुख, निवळी गटातून विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र काळे, नरसिंग बुलबुले, रसूल पटेल, शिराळा गटातून तात्यासाहेब पालकर, रणजित पाटील, गोवर्धन मोरे, कासारजवळा गटातून माजी आमदार वैजनाथ शिंदे, अनंत बारबोले, हणमंत पवार, चिंचोलीराववाडी गटातून नेताजी साळुंके, नितीन पाटील, रामराव साळुंके, बाभळगाव गटातून अमित देशमुख, अमृत जाधव, सतीश शिंदे, अनुसूचित जाती गटातून दीपक बनसोडे, इतर मागसवर्गीय गटातून शाम बरुरे तर भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास गटातून सुभाष माने उमेदवारी दिली आहे.

विरोधात वायाळ दाम्पत्याचे पाच अर्ज

कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा असतानाच भिसेवाघोलीच्या सरपंच स्वंयम वायाळ यांनी बुधवारी महिला गटातून एक तर गुरुवारी पुन्हा महिला व शिराळा गटातून दोन असे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांचे पती व भिसेवाघोलीचे उपसरपंच संभाजी वायाळ यांनी बुधवारी शिराळा तर गुरुवारी इतर मागासवर्गीय गटातून असे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन अर्ज दाखल केले आहेत. वायाळ दाम्पत्यांनी दाखल केलेल्या पाच उमेदवारी अर्जामुळे कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीची घोडे अडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com