Sugarcane FRP : उद्यापर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा महामार्ग अडविणार

Raju Shetti : गतवर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि यावर्षीच्या उसाला ३५०० पहिली उचल द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता. १९) जिल्‍हाभर रास्‍ता रोको आंदोलन केले.
Sugarcane FRP Protest
Sugarcane FRP ProtestAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : गतवर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि यावर्षीच्या उसाला ३५०० पहिली उचल द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता. १९) जिल्‍हाभर रास्‍ता रोको आंदोलन केले. कोल्‍हापूर-सांगली महामार्गासह अन्य ग्रामीण भागातही रास्ता रोको आंदोलन झाले. दरम्यान, ‘‘उद्यापर्यंत (ता.२१) निर्णय न झाल्यास पुढील रविवारी राष्‍ट्रीय महामार्ग रोखू,’’ असा इशारा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले येथे आंदोलनादरम्यान दिला.

अनेक ठिकाणी तब्बल दोन तासांहून अधिक काळ ‘चक्का जाम’ केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते आदी ठिकाणी रास्ता रोको झाला. शेट्टी यांच्यासह विविध ठिकाणी स्वाभिमानीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली.

Sugarcane FRP Protest
Water Bill : पाणीपट्टीतून मुळा-मुठा तिरावरील गावे वगळा

उसाला दर अपेक्षित दर मिळवा, या साठी शेट्टी यांनी १३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये २१ दिवस आक्रोश पदयात्रा काढून उसाला दर द्यावा, या मागणीचे निवेदन साखर कारखान्यांना दिले. तसेच तोडगा निघण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र ऊस दराचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे शेट्टी यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस असणाऱ्‍या भागांत चक्का जाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

Sugarcane FRP Protest
Fisheries : मत्स्य व्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

याला चांगला प्रतिसाद मिळाला. काही मार्गावरील बससेवा सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत स्थगित ठेवण्यात आली. दुपारनंतर सर्व वाहतूक सुरळीत झाली. सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कोरेगाव) येथे रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

सांगली जिल्ह्यात ऊसतोडी थांबविल्या

सांगली : ‘स्वाभिमानी’तर्फे सांगली जिल्ह्यात रविवारी विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सांगली इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी चौकात सकाळी अकरा वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी यांनी चक्का जाम आंदोलन केले. कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, मिरज, तासगाव या तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस तोडी थांबवल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com