Natural Sugar Mill
Natural Sugar MillAgrowon

Natural Sugar Mill : कर्जमुक्त होऊन ‘नॅचरल’ला ७६ कोटी रुपयांवर नफा

Sugar Factory : नॅचरल उद्योग समूह कर्जमुक्त झाला आहे. या शिवाय वर्षात ७६ कोटी २९ लाख रुपये नफा झाला आहे.
Published on

Dharashiv News : ‘‘नॅचरल उद्योग समूह कर्जमुक्त झाला आहे. या शिवाय वर्षात ७६ कोटी २९ लाख रुपये नफा झाला आहे. त्यातून कारखान्याच्या सभासदांना २५ टक्के लाभांश देण्यात येईल. सभासदांना लाभांश देणारा देशांतील पहिला साखर उद्योग आहे,’’ अशी माहिती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली

Natural Sugar Mill
Dairy : नॅचरल दूध देणार दूध उत्पादकांसह संकलकांना बोनस ः बी. बी. ठोंबरे

नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी या कारखान्याची २४ वी वार्षिक सर्व साधारण सभा श्री. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या वेळी अनिल ठोंबरे, हर्षल ठोंबरे, बिभीषण भातलंवडे, सुनील कोचेटा, प्रभावती गोरे, राजपाल माने, किशोर डाळे उपस्थित होते.

Natural Sugar Mill
Natural Sugar : ‘नॅचरल’कडे १५ हजार हेक्टर उसाची नोंद

ठोंबरे म्हणाले,‘‘उसाचे अपेक्षित गाळप होऊनही साखर कारखाना युनिट तोट्यात जाऊनही केवळ उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात आहे. साखर उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे.

ऊस गाळपाबरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून वीज निर्मिती, इथेनॉल व बायो सीएनजी प्रकल्प, डेअरी प्रकल्पामुळे कारखाना नफ्यात आहे. साखर उद्योग टिकवायचा असेल तर साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती करून त्या मधून नफा मिळवावा लागेल. या वर्षात ‘नॅचरल’ने सर्वाधिक ऊस दर दिला आहे.’’

‘‘चालू हंगामात प्रतिदिन ७५०० टन गाळप करण्यात येईल. या वर्षी हंगामात १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. साखर कारखाना, डिस्टिलरी आणि दूध डेअरीतून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचे हीत जोपासण्याचा प्रयत्न आहे,’’ असेही श्री. ठोंबरे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com