
Chh. Sambhajinagar News : ‘स्वतःचे घर स्वतःच्या ताब्यात’ या मोहिमेअंतर्गत २५ हजार घरांचे बांधकाम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी (ता. १८) दिले.
विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक यांच्याकडून विविध योजनांचा आढावा घेतला.
या वेळी त्यांनी जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, रमाई शबरी, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना तसेच १५० दिवस मुख्यमंत्री कार्यक्रम व वृक्ष लागवड जलसंधारण जल पुनर्भरण आदी योजनांची अंबलबजावणी देखील गतीने करण्याची सूचना केली.
श्री. पापळकर म्हणाले, की पंतप्रधान घरकुल योजनेसह विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुलांची कामे १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करून संबंधितांना घरकुल वाटप करण्यात यावे. तसेच उर्वरित घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण होतील, याबाबत नियोजन करावे. विभागातील योजनानिहाय नियमितपणे आढावा घेत प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूक्ष्म नियोजन करून प्रलंबित योजनांचा लाभ पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचावा.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वयंसहायता समूहांना बँक कर्जवाटप तसेच आर्थिक प्रगती व भौतीक प्रगती, लखपती दीदी योजनेबाबतही त्यांनी या वेळी आढावा घेतला. पात्र लाभार्थीना घरकुल योजनांचा लाभ वेळेत देण्याबाबत नियोजन करा, असे निर्देश त्यांनी दिले.
जलजीवन मिशन सर्वकष योजना, लघू पाटबंधारे जिल्हा परिषद योजनांचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना कोल्हापुरी बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसविणे दुरुस्ती व पाणी अडविण्याबाबतही योजनांबाबतही या वेळी माहिती देण्यात आली.
ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण, तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामांसाठी विशेष अनुदान, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम, स्थानिक विकास निधी कार्यक्रम, जिल्हा परिषद स्तरावरील मंजूर कामे, शासन स्तरावरीत मंजूर कामांबाबतही आढावा घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषिक्रांती योजना तसेच १५ वा वित्त आयोग राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, ग्रामपंचायत कर वसुली, एक दिवस गावकऱ्यांसमवेत उपक्रम या उप्रकमासह शाळा खोली बांधकाम, आदर्श शाळा खोली बांधकाम, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आर्थिक प्रगती आढावा, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अपूर्ण कामाचा आढावा घेत याबाबत कामांना गती द्यावी, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत योजना आढावा या वेळी घेण्यात आला.
केंद व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबतचे नियोजन करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळाला पाहीजे, असे नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीस सर्व जिल्ह्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच अपर आयुक्त आस्थापना, सहायक आयुक्त विकास व विभाग अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.