Industrial Meet : ‘इंडस्ट्रियल मिट’च्या माध्यमातून २५० सामंजस्य करार

Bhagwat Karad : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मसिआ सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे शहरातील तब्बल २५० उद्योजक यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून शहराचा विकास तर होईलच पण अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी देखील पोषक वातावरण निर्माण होईल त्यातून रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होईल, असे मत डाॅ. भागवत कराड यांनी मांडले.
Industrial Meet
Industrial MeetAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १८) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत झालेल्या ‘इंडस्ट्रियल मिट’च्या माध्यमातून २५० सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

Industrial Meet
Tur, Chana Market : औरंगाबाद जिल्ह्यात तूर खरेदीला प्रतिसाद नाही, तर हरभरा खरेदीला प्रतीक्षा

 चिकलठाणा एमआयडीसी येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मिट’ कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील, लघू उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, माजी महापौर बापू घडामोडे, सहायक आयुक्त संपत चाटे, उपायुक्त सु. द. सैंदाणे उपस्थित होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.

Industrial Meet
Kharif Season : पावसाची ओढ वाढली...! सोयाबीन फुलोऱ्यात, कपाशीला फुलपात्या ः उत्पादन घटीचे सावट

डॉ. कराड म्हणाले, की ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी उद्योग क्षेत्रात काम वाढवावे लागणार आहे. २०४७ ला आपला देश विकसित राष्ट्र तसेच विश्‍वगुरू व्हावा, यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे.

२५० सामंजस्य करार

बेरोजगार उमेदवारांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या मार्फत शुक्रवारी २५० कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. यातून युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागाच्या वतीने आयोजित इंडस्ट्रियल मिटमध्ये इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज यांनी आजअखेर शासनासमवेत सामंजस्य करार केले आहेत. या वेळी औद्योगिक आस्थापना, प्रतिनिधी, औद्योगिक संघटना प्रतिनिधी, प्लेसमेंट एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com