Farmers From Kolhapur : ‘महाडीबीटी’द्वारे कोल्हापुरातील २४६९ शेतकऱ्यांची निवड

Agriculture Department : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर कृषी विभागाच्या योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर तसे एसएमएस पाठविण्यात आलेला आहे.
Kolhapur Farmers
Kolhapur Farmersagrowon
Published on
Updated on

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ४६९ शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे झाली आहे. यातून १३.२८ कोटी रुपयांचा लाभ त्यांना मिळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर कृषी विभागाच्या योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर तसे एसएमएस पाठविण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या १० दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी कळवले आहे.

ही पूर्तता केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लगेचच पूर्व संमती मिळणार आहे. फार्मर आयडीच्या आधारे लॉगईन केल्यानंतर पुढील माहिती मिळू शकेल. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी जवळील सीएससी केंद्रातून काढून घ्यावा. पात्र लाभार्थ्यांकडून येत्या १० दिवसांत कागदपत्राची पूर्तता न झाल्यास तो अर्ज आपोआप रद्द होणार आहे.

शेती यांत्रिकीकरण यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २७ अर्जांसाठी लाभाची एकूण रक्कम ३२ लाख २५ हजार आहे. तर कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात १५८६ शेतकऱ्यांना ८ कोटी ५० लाख ११ हजार ४०० रुपये लाभाची रक्कम आहे. सिंचन क्षेत्रात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे साठी २६१ शेतकऱ्यांना १ कोटी ३७ लाख ९१ हजार ३५७ रुपये मिळणार आहेत.

Kolhapur Farmers
Kolhapur Rainfall: कोल्हापुरात पाऊस सुरूच, पाच बंधारे पाण्याखाली

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात १२ अर्जांसाठी ९ लाख ८५ हजार ९६४ लाभाची रक्कम आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक) या अंतर्गत ३७४ अर्जांसाठी १ कोटी ५९ लाख २९ हजार २७६ रुपये लाभाची रक्कम आहे. तर आरकेव्हीवाय शेततळ्याला प्लॅस्टिक आच्छादन साठी १४९ अर्जांसाठी ८२ लाख १० हजार ४०२ लाभाची रक्कम आहे.

फलोत्पादन घटकाअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ६० अर्जांसाठी ५७ लाख ३८ हजार १५५ रुपयांच्या लाभाची रक्कम आहे. अशा प्रकारे एकूण २ हजार ४६९ अर्जांच्या निवडीनंतर १३ कोटी २८ लाख ९१ हजार ५५४ रुपयांची लाभाची रक्कम जिल्ह्यासाठी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com