Farmer Issue : संमतिपत्राविना २४ लाख शेतकरी मदतीपासून वंचित

Farmers deprived of aid without consent letter : ६ लाखांपैकी २४ लाख शेतकऱ्यांनी संमतिपत्रेच सादर केलेली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, अशा पेचात कृषी विभागाची यंत्रणा पडली आहे.
Agriculture Update
Agriculture UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदतवाटप करणारी योजना अद्यापही पूर्णत्वाला गेलेली नाही. ९६ लाखांपैकी २४ लाख शेतकऱ्यांनी संमतिपत्रेच सादर केलेली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, अशा पेचात कृषी विभागाची यंत्रणा पडली आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये मदत जमा करण्याचा निर्णय शासनाने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

Agriculture Update
Farmer Issue : शेतकऱ्यांना क्विंटलमागे ८०० रुपयांचा भुर्दंड

या यादीतील वैयक्तिक शेतकऱ्यांने त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती कृषी सहायकाकडे देणे बंधनकारक आहे. तसेच सामायिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्यातील कोणत्याही एका शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याबाबत संमतिपत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे. एका संकेतस्थळावरच ही माहिती भरण्याची सुविधा शासनाने दिली आहे. त्यासाठी कृषी सहायकांना प्रतिनोंदणी २० रुपये सेवाशुल्क दिले जात आहे.

कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी चांगला पाठपुरावा करीत राज्यभर ७२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. यातील ५३ लाख शेतकऱ्यांची पूर्ण माहिती प्राप्त झालेली आहे. परिणामी, त्यांच्या बॅंक खात्यात मदतीपोटी आतापर्यंत दोन हजार ५७८ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. यातील अजून चार लाख शेतकऱ्यांना मदत देणे बाकी असून, निवडणूक आचारसंहिता समाप्त होताच अंदाजे १०० कोटी रुपये राज्यभर वाटले जाण्याची शक्यता आहे.

Agriculture Update
Soybean Rate: सोयाबीनच्या भावात नरमाई

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक स्वरूपातील जवळपास ९७ टक्के पात्र शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. मदत न मिळू शकलेले अंदाजे २४ लाख शेतकरी हे बहुतांश संयुक्त खातेदार आहेत. संयुक्त खात्यांमध्ये अनेक भागांमध्ये वाद आहेत. त्यामुळे मदत जमा करण्यासाठी कोणत्याही एका खातेदाराला संमती देण्यास इतर खातेदार तयार नसतात.

परिणामी, मदत वाटप रखडले आहे. कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडून कापूस, सोयाबीन मदतवाटप प्रक्रियेचा नुकताच आढावा घेण्यात आला. कृषी विभागाकडून शक्य होत असलेले मदत वाटपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

चार लाख शेतकऱ्यांना लवकरच मदत

आधार संलग्नतेची संमती दिलेल्या ७२ लाख शेतकऱ्यांपैकी अद्याप चार लाख शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदत पाठवली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com