Electricity Bill Recovery : धाराशिवच्या वीजग्राहकांनी भरली १४ कोटींची थकबाकी

Electricity Bill : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘महावितरण’ने अभय योजना सुरू केली आहे.
Electricity Bill Recovery
Electricity Bill RecoveryAgrowon
Published on
Updated on

Pending Electricity Bill : धाराशिव : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘महावितरण’ने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केवळ मुद्दल भरून संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येत असल्याने या योजनेचा लाभ घेत लातूर परिमंडळातील १० हजार ५४२ वीजग्राहकांनी १४ कोटी ४५ लाखांचा भरणा केला आहे.

यामुळे व्याज व विलंब आकाराचे तब्बल १० कोटी ५९ लाख माफ करण्यात आले. ‘महावितरण’च्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली होती. योजनेस ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Electricity Bill Recovery
Electricity Bill Recovery : चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा

यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ १४ दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने देण्यात आलेल्या वाढीव मुदतीत ग्राहकांनी थकबाकी भरावी, असे आवाहन लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले.

परिमंडळाच्या जिल्ह्यातील स्थिती

जिल्ह्यातील ४ हजार ९७९ वीजग्राहकांनी ३ कोटी ३२ लाख रुपयांची भरत १ कोटी ४३ लाख रुपयांची माफी मिळवली आहे. यामध्ये लातूर विभागाच्या १ हजार ४७ ग्राहकांनी ८४ लाख रुपयांचा भरणा करत ३४ लाख रुपयांची सूट मिळवली आहे. निलंगा विभागातील २ हजार १७१ ग्राहकांनी १ कोटी ३६ लाख रुपयांचा भरणा करत ५२ लाख रुपयांची सूट तर उदगीर विभागातील १ हजार ७६१ ग्राहकांनी १ कोटी ११ लाख रुपयांचा भरणा करत ५७ लाख रुपयांची सूट मिळवली आहे.

धाराशिव : जिल्ह्यातील कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या २ हजार २२८ वीजग्राहकांनी १ कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा करत १ कोटी १० लाख रुपयांची सूट मिळवली आहे. यामध्ये तुळजापूर विभागातील ८०० वीजग्राहकांनी ६३ लाख रुपयांचा भरणा करत ३७ लाख रुपयांची तर धाराशिव विभागातील १४२८ वीजग्राहकांनी ८५ लाख रुपयांचा भरणा करत ७३ लाख रुपयांची सूट मिळवली आहे.

बीड : जिल्ह्यातील ३ हजार ३३५ वीजग्राहकांनी ९ कोटी ६५ लाख रुपयांचा भरणा करत ८ कोटी ६ लाख रुपयांची सूट प्राप्त केली आहे. यामध्ये अंबाजोगाई विभागातील ९५७ वीजग्राहकांनी ६ कोटी ७७ लाख रुपयांचा भरणा करत ५ कोटी ११ लाख रुपयांची तर बीड विभागातील २ हजार ३७८ वीजग्राहकांनी २ कोटी ८८ लाख रुपयांचा भरणा करत २ कोटी ९५ लाख रुपयांची सूट मिळवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com