Crop Loss Compensation : अतिवृष्टी नुकसानीचे २२ कोटी ३३ लाख अनुदान

Heavy Rain Crop Damage : यंदा सततच्या पावसाने तसेच ढगफुटीसदृश पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Jalkot News : यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील ४७ गावांमधील २६ हजार ५९३ शेतकऱ्यांचे १६ हजार ४२३.९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाकडून २२ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली. यंदा सततच्या पावसाने तसेच ढगफुटीसदृश पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.

Crop Loan
Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

या नुकसानीची त्यावेळी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी पाहणी केली होती. जिल्हा व तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी, महसूल, कृषी विभागानेदेखील पाहणी करून शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार हे अनुदान प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच वाटप केले जाणार आहे.

Crop Loan
Crop Damage Compensation : शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ५४८ कोटींच्या निधी वितरणास मंजुरी

अनुदानाची रक्कम वाटपासाठी तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही चालू असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्याची कारवाई तत्काळ सुरू करण्यात येणार आहे, असे तहसिलदार राजेश लांडगे, नायब तहसीलदार प्रकाश कुडदे व संतोष गुट्टे यांनी सांगितले.

अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ मध्ये शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल सादर केला असून, त्यानुसार तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांना शासन निर्देशानुसार हेक्टरी १३ हजार ६०० रुपये याप्रमाणे (तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत) हे अनुदान लवकरच महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
- आकाश पवार, तालुका कृषी अधिकारी, जळकोट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com