PM Kisan : ‘पीएम किसान’मधून २१ हजार शेतकरी बाद

PM Kisan Scheme : पीएम किसान सन्मान योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ती न केल्याने जिल्ह्यातील २१ हजार १९३ शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
PM Kisan
PM KisanAgrowon
Published on
Updated on

Amravati News : पीएम किसान सन्मान योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ती न केल्याने जिल्ह्यातील २१ हजार १९३ शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. कृषी विभागाने या शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे.

पीएम किसान सन्मान योजनेत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा लाभ दिल्या जातो. या योजनेचा १४ हप्ते आतापर्यंत वितरित झाले आहेत. या योजनेत काही अपात्र शेतकरीही आढळले असल्याने त्यांचा लाभ थांबवून वितरित झालेला लाभ वसूल करण्यात येत आहे.

PM Kisan
PM Kisan : कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही ३८ हजार शेतकरी पीएम किसानपासून वंचीत

योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी व आधार लिंक करणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाने तब्बल पाच वेळा मुदतवाढ दिली आहे. याशिवाय ही योजना आता कृषी विभागाकडे सोपविण्यात आल्यानंतर कृषी विभागाने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करावी व आधार लिंक करण्यासाठी गावागावांत शिबिरे घेतली.

PM Kisan
PM Kisan Scheme : ‘पीएम’, ‘नमो’पासून ९३ हजार शेतकरी वंचित

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६४ हजार ९९५ खातेदारांनी ही प्रक्रिया पार पाडली आहे. याचे प्रमाण सरासरी ९३ टक्के आहे. नोंदणी करण्यात आलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी २१ हजार १९३ लाभार्थ्यांनी मात्र वारंवार सूचना देऊन व आवाहन करूनही प्रतिसाद दिलेला नाही. आता या खातेदारांची नावे वगळण्याशिवाय पर्याय नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले.

तालुकानिहाय वगळण्यात येणारे खातेदार

अमरावती : १२३७, तिवसा : ६६३, भातकुली : १२१४, चांदूररेल्वे : १२७१, धामणगावरेल्वे : २१२०, नांदगाव खंडेश्वर : १२६३, अचलपूर : १६१८, चांदूरबाजार : २२६२, मोर्शी : १९०५, वरूड : ११९४, दर्यापूर : १६७०, अंजनगावसुर्जी : ८२०, धारणी : २२३४, चिखलदरा : १७२२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com