Book Review : माणसांच्या अस्तित्वालाच भिडणाऱ्या प्रश्‍नांचा मागोवा

Yuval Noah Harari : इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत वर्तमान अधिक सुसह्य कसे करता येईल यावर भाष्य करणे, हेच खरे कोणत्याही इतिहास संशोधकाचे ध्येय असले पाहिजे.
Yuval Noah Harari Book
Yuval Noah Harari BookAgrowon
Published on
Updated on

सतीश कुलकर्णी
--------------------
21 lessons from the 21st century Book Review : इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत वर्तमान अधिक सुसह्य कसे करता येईल यावर भाष्य करणे, हेच खरे कोणत्याही इतिहास संशोधकाचे ध्येय असले पाहिजे. या प्रचंड आवाका असलेल्या कसोटीवर उतरणारा इतिहासकार म्हणजे युवाल नोवाह हरारी.

ते इस्राईल येथील हिब्रू विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्रोफेसर आहेत. त्यांची मानवी प्रजातीच्या इतिहासावरील ‘सेपियन्स’ आणि ‘होमो ड्युएस’ ही दोन पुस्तके जगभरातील विचारवंतामध्ये मान्यताप्राप्त झाली आहेत. त्यांचे तिसरे पुस्तक ‘२१ लेसन्स फ्रॉम दि २१ सेंच्यूरी’ हे बाजारात आले आहे. त्याचा अनुवाद सुनील तांबे यांनी केला असून, मधुश्री प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.

युवाल नोवाह हरारी यांना विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले होते, की जागतिकीकरण, वातावरण बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या तीन बाबी केवळ माणसांच्याच नव्हे, तर पृथ्वीच्या भविष्यावर सर्वांत मोठा परिणाम करणार आहेत. सामान्यतः जागतिकीकरण, वातावरण बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द आले, की ते टाळून जाण्याची वृत्ती कोणत्याही सर्वसामान्य माणसांमध्ये असते.

सुरुवातीला शिकारीसाठी दगडांची हत्यारे करण्यापासून सुरू झालेला प्रवास आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण मानव जात नष्ट करण्याची क्षमता असलेल्या अणू किंवा हायड्रोजन बॉम्बपर्यंत पोहोचला आहे. एका अविचारी कृत्यातून संपूर्ण पृथ्वी बेचिराख करण्याची क्षमता मानवाकडे आली आहे. या प्रगतीचा अभिमान बाळगावा की लाज वाटावी, असा विचार कोणत्याही संवेदनशील माणसाला पडू शकतो.

Yuval Noah Harari Book
Pre-Kharif Review Meetings : लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर प्रश्‍नांचा भडिमार

हा जागतिक पातळीवरील प्रश्‍न असला, तरी कोणीही गावखेड्यातील माणूस अविचारी कृत्यातून उद्‍भविलेल्या या समस्येतून वाचू शकणार नाही. आपण तर ग्रामीण भागातील साधी शेतकरी माणसे आपला या जागतिक, मोठ्या समस्येशी काय संबंध, असे एखाद्याला वाटू शकेल.

मात्र एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की शहामृगी वृत्तीने वाळूत मान खुपसून बसणे एकवेळ शहरी माणसांला परवडू शकेल, मात्र शेतकऱ्याला परवडणारे नाही. कारण आज मानवासमोर असलेल्या जागतिक समस्यांमधील मुख्य वातावरण बदलाचा आपल्या शेतीवर सर्वाधिक परिणाम होतो.

त्यामुळे ठरणारे पर्जन्यमान, आपल्या पिकांचे उत्पादन, त्यावर येणाऱ्या किडरोगांच्या प्रादुर्भाव हे वातावरणावर अवलंबून असूनही त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. या प्रमाणे २१ व्या शतकातील मानवाला भेडसाविणारे २१ प्रश्‍न लेखक युवाल नोवाह हरारी आपल्या समोर मांडतो. यातील प्रत्येक प्रश्‍न हा जागतिक पातळीवरील सर्व माणसांवरच नव्हे, प्रत्येक सजीव आणि पृथ्वीवर परिणाम करणारा आहे.

ते सोडविण्याचे काय उपाय असू शकतात, याचीही मांडणी लेखक सविस्तरपणे करतो. या पृथ्वीचा सुजाण व त्यातल्या त्यात अधिक बुद्धिमान रहिवासी म्हणून आपली जबाबदारी, कर्तव्य लेखक द्रष्टेपणाने सांगतो. हीच दूरदृष्टी प्रत्येकाने (यात माणूस, समाज, देश सर्व आले) ठेवल्यास समस्या सुटण्यास मदत होईल. अन्यथा, मानव प्रजाती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही लेखक या पुस्तकातून देतो.

Yuval Noah Harari Book
Sapians Book Review : सेपियन्स ः मानवजातीचा संक्षिप्त इतिहास

पुस्तक ः २१ लेसन्स फ्रॉम दि २१ सेंच्यूरी
लेखक ः युवाल नोवाह हरारी
मराठी अनुवाद ः २१ व्या शतकासाठी २१ धडे
अनुवाद ः सुनील तांबे
प्रकाशन ः मधुश्री प्रकाशन, पुणे.
मूल्य ः पेपरबॅक ४०० रुपये (काही वेबसाइटवर सवलतीमध्ये ३७६ रुपये)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com