Soybean Crop Insurance : परभणी जिल्ह्यात सोयाबीनसाठी २०६ कोटींचा ‘अग्रिम’ मंजूर

Soybean Season : ‘‘यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांतील ४ लाख ४१ हजार १७३ सोयाबीन उत्पादकांना मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम अंतर्गत संभाव्य विमा भरपाईपैकी २०६ कोटी ११ लाख १४ हजार रुपये म्हणजे २५ टक्के अग्रिम विमाभरपाई मंजूर झाली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Parbhani News : ‘‘यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांतील ४ लाख ४१ हजार १७३ सोयाबीन उत्पादकांना मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम अंतर्गत संभाव्य विमा भरपाईपैकी २०६ कोटी ११ लाख १४ हजार रुपये म्हणजे २५ टक्के अग्रिम विमाभरपाई मंजूर झाली आहे.

Crop Insurance
Irrigation Department : चार प्रकल्पांतून फेब्रुवारीपर्यंत मिळणार पाणी

बँक खात्यावर रक्कम जमा केली जात आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे यांनी दिली. विमा कंपनीने तब्बल दोन महिन्यांनंतर या आदेशाची अंमलबजावणी केली, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Crop Insurance
Soyabean Bhav : सोयबीन पीक झालं तोट्याचं, शेतकऱ्यांच्या व्यथा | Agrowon |ॲग्रोवन

तालुकानिहाय अग्रिम रक्कम

परभणी तालुक्याला सर्वाधिक ४६ कोटी ११ लाख ९९ हजार २९६ रुपये, जिंतूरसाठी ३० कोटी ९२ लाख ६३ हजार ५६९ रुपये, सेलूसाठी १५ कोटी २४ लाख ७१ हजार ९४३ रुपये, मानवतसाठी १४ कोटी ८२ लाख २७ हजार २१३ रुपये, पाथरीसाठी १६ कोटी २० लाख १५ हजार ६९० रुपये, सोनपेठसाठी १५ कोटी ३२ लाख ५६ हजार ४६२ रुपये, गंगाखेडसाठी २४ कोटी ९५ लाख ४० हजार ३५२ रुपये, पालमसाठी १७ कोटी ७० लाख ४१ हजार ७३६ रुपये, पूर्णासाठी २४ कोटी ८१ लाख ३० हजार ८२५ रुपये अग्रिम मंजूर झाला आहे.

मंडलनिहाय पीकविमा अर्जं, अग्रिम रक्कम (कोटी रुपये)

मंडल पीकविमा अर्ज अग्रिम रक्कम मंडल पीकविमा अर्ज अग्रिम रक्कम

परभणी शहर १०३१ ०.७८१६ परभणी ग्रामीण ९३५३ ४.६६७७

पेडगाव ७१७४ ४.२६३३ जांब १२००५ ६.७४३२

सिंगणापूर ८८०९ ५.७००९ दैठणा १३७१९ ९.०४५८

झरी ११०८७ ५.४४४१ पिंगळी १०६७२ ५.३८५४

टाकळी कुंभकर्ण ६९८६ ४.०९ जिंतूर ८३८४ ५.४९८६

बोरी ८११९ ४.००४० सावंगी म्हाळसा ७९६५ ३.८७३५

बामणी ९२०४ ३.२८३८ आडगाव ७६२४ ३.२३१७

चारठाणा ७२०७ ३.०९३३ वाघी धानोरा ८४१९ ३.१००९

दूधगाव १०१४१ ४.८३१३ सेलू ५९९० ३.९५९८

देऊळगाव गात ६७९५ २.५७८३ वालूर ६८७५ २.४१७१

कुपटा ७१३६ २.५८३२ चिकलठाणा ६६९९ १.९९७०

मोरेगाव ४७११ १.७११५ मानवत ७००१ ३.२२२५

कोल्हा ६७११ २.६५८५ केकरजवळा ५१७० ३.३८७७

रामपुरी ६११४ ३.३५५२ ताडबोरगाव ५७३१ २.१६५५

पाथरी ८०८२ ५.१३१० बाभळगाव ८७८२ ५.१३१०

हादगाव ६७१९ २.७४७१ कासापुरी ७७२७ ३.२५३५

सोनपेठ ८०३८ ४.४२०७ आवलगाव ८५०९ ३.८४५६

शेळगाव ५३२२ २.९४०२ वडगाव ९७७३ ४.११९०

गंगाखेड १०२८१ ३.०२८३ महातपुरी ११११७ ६.१३३८

माखणी १५१४७ ६.०७०१ राणीसावरगाव १११८० ३.९६१०

पिंपळदरी १२४८३ ५.७५५८ पालम ९८७४ २.८७९६

चाटोरी ९०४९ ३.५०११ बनवस ६३७९ २.९९५५

रावराजूर ९०४२ ४.१७९६ पेठशिवणी १०६२२ ४.१४८२

पूर्णा ८७६० ३.९००१ ताडकळस ९०६० ४.४५९६

लिमला १०२२८ ४.९३८३ कात्नेश्‍वर ९३३३ ४.०११७

चुडावा ९८८४ ४.०४९० कावलगाव ९७४७ ३.३९४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com