Bank Loan Refund : शून्य टक्क्याने कर्ज देणाऱ्या बँकांना २०० कोटींचा परतावा

Loan Refund Update : शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याजदराने पीककर्ज उपलब्ध करून देणाऱ्या १७ जिल्हा बँकांना राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
Bank
BankAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याजदराने पीककर्ज उपलब्ध करून देणाऱ्या १७ जिल्हा बँकांना राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. राज्य सरकार या बँकांना अडीच टक्के दराने हा परतावा देत आहे. हा परतावा २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षांच्या काळातील असून, २०२१-२२ व २०२२-२३ या दोन आर्थिक वर्षांतील सुमारे ५४३ कोटी रुपयांच्या परताव्याचा प्रस्ताव सहकार विभागाकडे आला असून, राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज बँकांमार्फत उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. या धोरणानुसार शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज बँकांकडून बिनव्याजी स्वरूपात उपलब्ध होत आहे. यासाठी राज्य सरकारने १७ बँकांसाठीचा २०० कोटी रुपयांचा परतावा बँकांच्या खात्यावर जमा केला आहे. हा परतावा तीन वर्षांसाठीचा आहे.

Bank
PDCC Bank News : संस्थांनी व्यवसाय विकास आराखडा हाती घेणे गरजेचे

सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत पीककर्ज बिनव्याजी स्वरूपात मिळत आहे. योजनेमध्ये राज्य सरकार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अडीच टक्के दराने व्याज परतावा देत असते. त्यानुसार जिल्हा बँकांच्या २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षांच्या काळातील २०० कोटी रुपयांच्या परताव्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी ४ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार हा परतावा राज्यातील १७ जिल्हा बँकांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

Bank
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेची अमृत महोत्सवी वाटचाल

जिल्हानिहाय परतावा

जिल्हा बँक व्याज परतावा (कोटी रुपयांमध्ये)

ठाणे, पालघर १.५६

रायगड ८९ लाख

नाशिक ३.२५

नगर २६.२३

जळगाव १०.४९

पुणे ३७.४०

कोल्हापूर ९.८८

सांगली १६.४९

सातारा २०.६९

छत्रपती संभाजीनगर ११.२३

लातूर २३.९७

अकोला-वाशीम १३.९७

यवतमाळ ८.०७

नागपूर ६० लाख

भंडारा २.५४

चंद्रपूर ६० लाख

गडचिरोली १.९५

पुणे अव्वल, खालोखाल अहिल्यानगर

पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सिंचन सुविधांमुळे विविध पिके शेतकरी घेत आहेत. यामुळे पीककर्ज मोठ्या प्रमाणावर घेण्याचा शेतकऱ्यांचा कल असल्याने पुणे जिल्हा बॅंकेला सर्वाधिक ३७ कोटी ४० लाख, तर अहिल्यानगरला २६ कोटी २३ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com