Onion
OnionAgrowon

Onion Export Duty: कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द 

Government Policy: कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. १ एप्रिल २०२५ पासून लागू होणारा हा निर्णय कांदा उत्पादकांना योग्य दर मिळवण्यासाठी आणि निर्यात सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
Published on

Nashik News: कांदा निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लागू असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. अखेर केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क रद्द केले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे.

लेट खरीपसह नवीन रब्बी उन्हाळ कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सुरू झाली होती. मात्र कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क लागू असल्याने निर्यातीवर परिणाम दिसून आला. तर सध्या बाजार आवारांमध्ये आवक वाढत असताना कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत होता.

Onion
Onion Rate : आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घरसण

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे असंतोष पाहायला मिळाला. लासलगावसारख्या प्रसिद्ध असलेल्या बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन पुकारले होते. तर अनेक भागात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. कांदा उत्पादक पट्ट्यातील खासदारांनी संसदेत आवाज उठवला होता.

राज्य सरकारतर्फे निर्यात शुल्क रद्द करण्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा होता. अखेर "देर आये, दुरुस्त आये" यानुसार केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाचे उपसचिव दिलमिल सिंग सोच यांच्या स्वाक्षरीने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ पासून निर्यात शुल्क रद्द करण्यात येणार आहे.

Onion
Onion Storage: शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक, प्रतवारी, पॅकिंग
केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. लासलगाव आणि पिंपळगाव बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे.
देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र
केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारे २० टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. हा प्रश्न सुटावा यासाठी आपण केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत थेट संवाद साधून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील. 
अजीत पवार, उपमुख्यमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com