Agriculture Sowing : दोन लाख १३ हजार हेक्टर पेरणीचा अंदाज

Kharif Sowing : गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमीच्या सरी पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Pune News : गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमीच्या सरी पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांत भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्यात खरिपाची दोन लाख १३ हजार ४०६ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात खरिपाची तयारी वेगाने सुरू आहे. पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात.

Kharif Season
Agriculture Sowing : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर कोल्हापुरात पेरणीला सुरुवात

यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून खरिपाचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना जवळच्या केंद्रात निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहे. तर काही ठिकाणी बांधावर शेतकऱ्यांना खते देण्यात येत आहेत.

पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे. त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिकेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही ठिकाणी रोपवाटिकांत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू झाली आहेत. पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत.

Kharif Season
Kharif Sowing : यंदा सव्वासहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित
माझी एकूण आठ एकर शेती आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. खरिपात अडीच एकरावर भात लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी रोपवाटिकेची तयारीही पूर्ण झाली आहे. याशिवाय भुईमूग, नाचणी, बटाटा या पिकांचीही लागवड करणार आहे.  
रोहिदास लखिमले,शेतकरी, भोयरे, ता. मावळ.  
यंदा खरिपात प्रामुख्याने मका, सोयाबीन पीक क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. खते, बियाणे कमी पडणार नाहीत. याशिवाय शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी वेळोवेळी कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येईल.
संजय काचोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे

यंदा खरीप हंगामात पेरणी होणारे अंदाजित क्षेत्र (हेक्टर)
भात ६०२००, बाजरी ३६,५६०, रागी ३३००, मका २९०००, तूर १६००, मूग १५०३०, उडीद १५६०, इतर खरीप कडधान्ये ८,५००, भुईमूग १४,०००, सोयाबीन ४७५००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com