

Pune News : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. पण शेतकऱ्यांच्याबाबत महायुती फेल झाल्याचे समोर आले आहे. महायुतीला शेतकरी आत्महत्या रोखत्या आलेल्या नसून ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान फक्त ६० दिवसात विदर्भात जवळपास २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
राज्यातील शेतकरी विविध मार्गाने आलेल्या संकटात घेरला गेला आहे. आताही अवकाळी पावसाने तूर, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर कांद्यालाही फटका बसला आहे. यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आणखीन संकटात सापडला आहे. दुष्काळ, कर्जाचे डोंगर यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्याच्या घटना थांबत्या थांबत नसल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक होत असून या पाठोपाठ विदर्भात होत आहेत.
राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडला. यावेळी राज्यातील शेतकरी मायबाप सरकार आपल्यासाठी काही तरी ठोस करेल अशा अपेक्षा लावून पहिल्या कॅबिनेटकडे बघत होता. मात्र तसे काही झाले नसून राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा समोर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत देखील शेतकरी आत्महत्या झाल्या असून फक्त ६० दिवसांत तब्बल १९७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळत जीवन संपवले आहे. एकीकडे नेते मंडळी सत्तेसाठी प्रचारात मग्न असतानाच पश्चिम विदर्भात ११ महिन्यात ९८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
राज्यात सोयाबीन आणि कपाशीला हमीभाव मिळत नसल्याने पिकण्यासाठी घातलेला पैसा देखील निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर कर्जबाजारीपणा वाढत जात आहे. शासकीय योजनेचा लाभ देखील मिळत नसल्याने शेतकरी हवालदील होत आहे. यातूनच आर्थिक अडचणी निर्माण होऊन शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत ९८५ शेतकरी आत्महत्या झाल्या असून सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. येथे ३१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
विदर्भातील प्रमाण
विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंता जनक बनले असून सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील २१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील क्रमश २०८ आणि १४७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या ९४ झाल्या असून त्या इतर जिल्ह्यांच्या मानाने कमी आहेत.
विदर्भातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांवरून प्रशासन तपास करत आहे. यामध्ये तपासाअंति ३०६ आत्महत्या प्रकरणे पात्र ठरली आहेत. तर २८७ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. सध्या ३९२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
दरम्यान विदर्भातील शेतकरी आत्महत्यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, राज्यात आताच सरकार सत्तेवर आले आहे. अजुन थोडा वेळ जाईल. पण सरकारने राज्यात आणि प्रामुख्याने मराठवाडा-विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारने योग्य प्लॅन आखात यावर काम करायला हवे. तर राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या होऊ यासाठी संवेदनशील मार्गाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्यावे : विधानसभेच्या निवडणुकीच्या ६० दिवसाच्या कालावधीत विदर्भातील १९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे धोरण, वाढता उत्पादन खर्च व नैसर्गिक आपत्तीत होणारे शेतकऱ्यांचे नुकसान या प्रमुख कारणांमुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या वाढत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.