Team Agrowon
माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
पण, अनेक ठिकाणी बोगस बियाणे विक्री केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे चांगली उगवण क्षमता असलेल्या बियाणे ओखळण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे.
बाजारातून खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेविषयी खात्री नसल्यामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याला प्राधान्य देतात.
बाजारातून खरेदी केलेले बियाणे असो वा घरचे बियाणे या दोन्ही बियाणांची उगवण क्षमता तपासल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या बोगस बियाण्याच्या पाकिटावर छपाईत फेरफार किंवा अधिकृत कंपनीच्या नावाशी मिळतेजुळते नाव वापरले जाते.
एक ओल्या गोणपाठावर धान्यातून सरसकट १०० दाणे, दीड ते दोन सेंमी अंतरावर १० -१० च्या रांगेत ओळीत ठेवावेत. त्याच्या दुसरे गोणपाठ टाकून त्याचे गुंडाळा करावा
६ ते ७ दिवस रोज त्यावर पाणी मारावे. त्यानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडावी.
एकूण बियाणांच्या ७० टक्के दाण्यांना चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे गुणवत्तेचे आहे असे समजावे. मगच पेरणी करावी.