
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी १९ हजार ९१० हेक्टर आंबा, काजूचे क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे १० कोटी ५३ लाख ९४ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. यावर्षी शासनाने तीन दिवस मुदतवाढ दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे.
हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यातील आंबा, काजू फळपिकासाठी राबविली जाते. गेल्या काही वर्षांत बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका आंबा, काजुला बसत आहे. त्यामुळे या योजनेमुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील ३८ हजार ४६७ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग दर्शविला होता.
यावर्षी या योजनेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरमधील अडचणीमुळे सात-बारा मिळणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले होते. याशिवाय विमा कंपनीच्या पोर्टलमधील तांत्रिक दोषामुळे अनेक शेतकरी विमा हप्ता भरण्यापासून वंचित राहिले होते. मात्र शासनाने तीन ते चार दिवस विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती.
या मुदतीचा मोठा फायदा आंबा, काजू बागायतदारांना झाला. जिल्ह्यातील ३१ हजार ४५४ आंबा बागायतदारांनी १४ हजार ६६७.८० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले. त्याकरिता १० कोटी २३ लाख ५६ हजार रुपये विमा हप्ता भराणा केला. १० हजार ७३६ काजू बागायतदारांनी ५ हजार २४३.१९ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले असून त्याकरिता २६ लाख ९७ हजार रुपये विमा हप्ता भरणा केला आहे.
जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी १९ हजार ९१०.९९ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले असून एकूण १० कोटी ५३ लाख ९४ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीकविमा योजनेत ४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे.
पीक : आंबा
तालुका शेतकरी
संख्या विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
देवगड ९ हजार ५२० ५ हजार २४५.७३
मालवण २ हजार ८५० १ हजार ४१३.१४
सावंतवाडी ३ हजार ४६५ १ हजार ४५७.१४
दोडामार्ग ३२ १५.४३
वेंगुर्ला ७ हजार ५२५ २ हजार ५५९.९९
कणकवली १ हजार ९८९ ९६६.६७
कुडाळ ५ हजार ५४९ २ हजार ७५७.१८
वैभववाडी ५२५ २५२.५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.