Summer Groundnut : उन्हाळी भुईमूग वाणांची वैशिष्ट्ये

Groundnut Cultivation : उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी विविध सुधारित वाण विकसित करण्यात आले आहेत. त्यानुसार योग्य वाणाची लागवडीसाठी निवड करावी.
Groundnut
Groundnut Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्‍वर्या राठोड

Groundnut Varieties and Characteristics : उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी बियाणे प्रमाण हे जातीनिहाय तसेच दाण्यांच्या आकारमानानुसार ठरविले जाते. कमी आकाराचे दाणे असलेल्या वाणासाठी १०० किलो, मध्यम आकाराच्या दाण्याच्या वाणासाठी १२५ किलो, तर टपोऱ्या दाण्यासाठी १५० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे बियाणे वापरावे.

उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी विविध सुधारित वाण विकसित करण्यात आले आहेत. त्यानुसार योग्य वाणाची लागवडीसाठी निवड करावी.

फुले उन्नती

(आरएचआरजी ६०८३)

प्रसारण वर्ष : २०१२

खरीप व उन्हाळी हंगामांसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित

पिकाचा कालावधी : खरीप १११ दिवस, उन्हाळी १२८ दिवस.

Groundnut
Groundnut Crop : उन्हाळी हंगामासाठी भुईमूग वाण अन् वैशिष्ट्ये

वैशिष्ट्ये :

उंची ४० ते ४५ सेंमी.

फुले नारंगी रंगाची, आऱ्या रंगीत.

शेंगा मध्यम आकाराच्या दोन दाणे असलेल्या

शेंगदाणे लाल रंगाचे

तेलाचे प्रमाण ५२ टक्के.

पाने खाणारी अळी, तांबेरा, टिक्का व खोडकुज रोगास प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : ३५ ते ४० क्विंटल

Groundnut
Groundnut Cultivation : उन्हाळी भुईमुग लागवडीची योग्य पद्धत

फुले चैतन्य (केडीजी-१६०)

प्रसारण वर्ष : २०१६

उन्हाळी हंगामासाठी आंध्र प्रदेश, तेलगंणा, तमिळनाडू प्रसारित

पिकाचा कालावधी : १०५ ते ११० दिवस

वैशिष्ट्ये :

खोडकुज, पानांवरील ठिपके आणि तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक्षम.

तेलाचे प्रमाण ५१.६ टक्के.

मध्यम टपोरे दाणे.

शेंगातील शेंगदाण्याचे प्रमाण ६५ ते ६९ टक्के

हेक्टरी उत्पादन : २० ते २४ क्विंटल

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृद्‍ शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com