PDCC Bank : ‘पीडीसीसी’कडून घरांसाठी १६५ कोटींचे कर्ज मंजूर

Cooperative Bank Loan : बॅंकेने आत्तापर्यत ५४३ नागरिकांना १६५ कोटी २९ लाख ४५ हजार रूपयांचे कर्ज मंजूर करून वितरित केले आहे.
PDCC Bank
PDCC BankAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘जिल्ह्यातील नागरिकांना आपले हक्काचे घर बांधता यावे, खरेदी करता यावे, या साठी पुणे जिल्हा बॅंकेने गृहकर्जाची सुविधा दिली आहे. बॅंकेने आत्तापर्यत ५४३ नागरिकांना १६५ कोटी २९ लाख ४५ हजार रूपयांचे कर्ज मंजूर करून वितरित केले आहे. त्यामुळे नागरिकांना हक्काचे घर मिळण्यास मदत झाली आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांबरोबरच आता पुणेकरांना नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी आणि नवी किंवा जुनी सदनिका (फ्लॅट) खरेदीसाठी आता ‘पीडीसीसी’ कमाल ७५ लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देणार आहे. जिल्हा बॅंकेच्या शहर व जिल्ह्यातील कोणत्याही शाखेतून गृहकर्ज देण्यात आहे.

PDCC Bank
PDCC Bank : पुणे जिल्हा सहकारी बँकेला ३५१ कोटींचा ढोबळ नफा

गेल्या वर्षी पुणे जिल्हा बॅंकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सध्या पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून जिल्हा बॅंकेच्या २९४ शाखा कार्यरत आहेत. सध्या बॅंकेचे नोव्हेबरअखेरीस एकूण खेळते भांडवल हे १६ हजार ५३ कोटी ७५ हजार रुपये आहे. तर ११ हजार ४१२ कोटी ४८ हजार रूपयांच्या ठेवी आहेत.

PDCC Bank
PDCC Bank Crop Loan : पुणे जिल्हा बँकेकडून एकाच महिन्यातच १३०० कोटींचे पीककर्ज

‘गृहकर्जाविषयी महत्त्वाचे...

- नोकरदार, व्यावसायिक आणि शेतकरी

- वार्षिक उत्पन्नानुसार प्रत्येकाची कमाल गृहकर्जाची रक्कम निश्‍चित

- नोकरदारांना पगार, शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न तर, व्यावसायिकांना वार्षिक नफ्याच्या प्रमाणात गृहकर्ज मिळणार

- नोकरदार नवीन घराचे बांधकाम, सदनिका खरेदीसाठी कर्ज घेऊ शकणार

- अन्य बॅंकेकडून घेतलेल्या गृहकर्जाचे जिल्हा बॅंकेकडे हस्तांतर करू शकणार

- गृहकर्जात ‘टॉप-अप’चा लाभ घेता येणार

- दरमहा पगाराच्या ७५ टक्क्याच्या प्रमाणात कर्ज मिळणार

- व्याजदर वार्षिक आठ टक्के राहणार

जिल्हा बॅंकेची नोव्हेबर २०२३ अखेरीस आर्थिक स्थिती (रुपये)

- अधिकृत भाग भांडवल---४०० कोटी ७३ लाख

- बॅंकेचा स्वनिधी---२ हजार ५४६ कोटी ३६ लाख

- एकूण ठेवी---११ हजार ४१२ कोटी ४८ लाख

- उपलब्ध निधी---१५ हजार ४५६ कोटी २३ लाख

- गुंतवणूक---४ हजार ७४१ कोटी ७९ लाख

- खेळते भांडवल---१६ हजार ५३ कोटी ७५ लाख

- कर्जासाठी उपलब्ध निधी---११ हजार ३४३ कोटी ५३ लाख

- अतिरिक्त निधी---१ हजार ३८२ कोटी ६० लाख

पात्र नोकरदार, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना नवीन घरासाठी सर्वांना या कर्जाचा लाभ दिला जात आहे. नागरिकांनी गृहकर्जासाठी बॅकेच्या शाखेशी संपर्क करावा.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बॅक, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com