Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी अकोल्यात १६४, तर बुलडाण्याला १५१ कोटींचा निधी मंजूर

Heavy Rain Crop Damage : पश्चिम विदर्भात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्रकार घडला होता.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Akola News : पश्चिम विदर्भात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्रकार घडला होता. या नुकसानाची भरपाई शासनाने मंजूर केली होती.

यासाठी आता निधी मंजूर केला असून अकोला जिल्ह्याला १६४, बुलडाणा १५१, तर वाशीम जिल्ह्यासाठी जवळपास ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. दिवाळीपूर्वी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे.

पावसामुळे अकोला जिल्ह्यात एक हजार १३१ गावांतील एक लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीला फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे १६४ कोटी १४ लाखांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे २२ ऑगस्टला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. दरम्यान शासनाच्या महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून शेतकऱ्यांसाठी १६४ कोटी १४ लाखांची मदत मंजूर केली आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नांदेड जिल्ह्याला नुकसानीपोटी ४२० कोटी रुपये मंजूर

जिल्ह्यात जुलैत चारवेळा अतिवृष्टी झाली. त्यात २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून २२ जुलैच्या दुपारीपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा जलमय झाला. मोर्णा, विद्रुपा, पूर्णा नद्यांना पूर आला होता. पावसाचा सर्वाधिक फटका तेल्हारा व अकोट तालुक्यातील गावांना बसला. तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरले.

पावसामुळे ५२ महसूल मंडलांपैकी ३४ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. आपत्तीमुळे तीन व्यक्ती मृत्यू पावल्या. नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करीत एक लाख ६८ हजार ९३७.०१ हेक्टरवरील पिकांची हानी, तर शेतकऱ्यांचे १६४ कोटी १४ लाख ५० हजार ९५५ रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला होता.

बुलडाणा जिल्ह्याला १५१ कोटी रुपयांचा निधी

जून-जुलैमधील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेती पिकांचे व शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५१ कोटींची बुलडाण्यासाठी सुमारे १५१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून मोठा आधार मिळणार आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी १४ कोटी रुपये अनुदान वितरणास मंजुरी

बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे नुकसान झाले होते. यासाठी १५१ कोटी आर्थिक मदत त्यांच्या खात्यात प्रक्रिया पूर्ण करून वितरित केली जाणार आहे. यामध्ये १० हजार ६७८ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले असून त्यासाठी ३५ कोटी ४० लक्ष रुपये एवढी आर्थिक मदत शासनाद्वारे मंजूर करण्यात आली आहे तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी ११५ कोटी ४० लक्ष इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आलेली आहे.

वाशीम जिल्ह्यात ५५ हजार २९७ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. यासाठी ६० हजार १६५ शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत ४७ कोटी रुपये मंजूर झाले. तर खरडून गेलेल्या १९२९ हेक्टर जमिनीसाठी ३ कोटी ४७ लाखांची मदत मंजूर केली आहे.

तर अमरावती जिल्ह्यात पीक नुकसासाठी ६५ कोटी ३१ लाख आणि जमीन नुकसानासाठी २४ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यात पीक नुकसानासाठी १८५ कोटी व जमीन नुकसानासाठी १९ कोटी रुपये अनुदान जाहीर झाले आहे. अमरावती विभागात २ हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्रासाठी ५५७ कोटी व जमीन बाधित क्षेत्रासाठी ७८ कोटी रुपये जाहीर झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com