Crop Damage Compensation : नांदेड जिल्ह्याला नुकसानीपोटी ४२० कोटी रुपये मंजूर

Heavy Rain Crop Loss : जुलैमध्ये तुफान पाऊस सर्वच तालुक्यांत बरसला होता. परंतु शेतीपिकांचे नुकसान मात्र कंधार व लोहा तालुका वगळता इतर १४ तालुक्यांत झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला होता.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुके वगळता इतर १४ तालुक्यांतील सहा लाख ३९ हजार २८७ शेतकऱ्यांना बसला होता.

या शेतीपिकांच्या नुकसानीबद्दल ४२० कोटी ४६ लाखांच्या रकमेला शासनाने मंजुरी दिली. पण यात जमिनी खरडून केल्यामुळे मागणी केलेल्या ३१ कोटी ७३ लाखांच्या मागणीचा उल्लेख नाही.

जुलैमध्ये तुफान पाऊस सर्वच तालुक्यांत बरसला होता. परंतु शेतीपिकांचे नुकसान मात्र कंधार व लोहा तालुका वगळता इतर १४ तालुक्यांत झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला होता. या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील सहा लाख ३९ हजार २८७ शेतकऱ्यांना बसला.

Crop Damage
Crop Damage Compensation : पुणे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईचे आदेश जारी

यात चार लाख ९० हजार ९८३ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, एक हजार ४९६ हेक्टर बागायती, तर २६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते.

यात शेतीपिकाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख, तर जमिनी खरडून केलेल्या आठ हजार ७२३ शेतकऱ्यांना भरपाईसाठी ३१ कोटी ७३ लाख रुपये अशी एकूण ४५२ कोटी २० लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती.

हे सानुग्रह अनुदान जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे, फळपिकांसाठी हेक्टर २२ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये प्रतिहेक्टर दोन मर्यादेपर्यंत मिळणार आहेत.

Crop Damage
Crop Damage Compensation : चौदा लाख शेतकऱ्यांना एक हजार कोटींची मदत

शेती नुकसानीच्या निधीचा उल्लेख नाही

संपूर्ण जमिनी खरडून गेलेल्या ५५२९ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ४७ हजार प्रमाणे २५ कोटी ९८ लाख, तर दुसऱ्याच्या शेतातील माती वाहून पिकांचे नुकसान झालेल्यांना ३१९१ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे पाच कोटी ७४ लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ३१ कोटी ७३ लाख रुपयांची मागणी केली होती. शासनाने काम मंजुरी दिलेल्या आदेशात या रकमेचा उल्लेख नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय मिळणारा निधी

तालुका मंजूर निधी

नांदेड २,७९,२५,९००

अर्धापूर २१,३७,८०,९५०

कंधार शून्य

लोहा शून्य

देगलूर ४८,५४,४८,५००

मुखेड ५७,५५,७१,९००

बिलोली ३७,९८,२५,०००

नायगाव ३०,०९,००,०००

धर्माबाद १६,०२,३१,०००

उमरी १९,६६,०५,०००

भोकर २२,३०,६०,४००

मुदखेड १२,०७,४३,३००

हदगाव ४७,११,६३,७५५

हिमायतनगर २५,४०,७३,५००

किनवट ५५,६४,१२,०००

माहूर २३,८९,१९,६३०

एकूण ४२०,४६,६०,८३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com