Crop Insurance : रब्बी पिकांचे १५ हजारांवर विमा प्रस्ताव दाखल

Rabi Crop Insurance Scheme : रब्बी ज्वारी पिकाच्या विमा प्रस्तावासाठी शनिवार (ता. ३०) पर्यंत तर गहू व हरभरा या पिकांच्या विमा प्रस्तावांसाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Crop Insurance : रब्बी पिकांचे १५ हजारांवर विमा प्रस्ताव दाखल
Published on
Updated on

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात सोमवार (ता. ११) पर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ हजार ३३२ पीकविमा प्रस्ताव दाखल केले असून २० हजार ३२२ हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

रब्बी ज्वारी पिकाच्या विमा प्रस्तावासाठी शनिवार (ता. ३०) पर्यंत तर गहू व हरभरा या पिकांच्या विमा प्रस्तावांसाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Crop Insurance : रब्बी पिकांचे १५ हजारांवर विमा प्रस्ताव दाखल
Crop Insurance : लातूर, धाराशिवला अग्रिम विमा भरपाई नाही

परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू (बागायती), हरभरा या पिकांचा तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग या पिकांचा रब्बी पीकविमा योजनेत समावेश आहे. रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पीकविमा योजना आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीकडून राबविली जात आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँक, PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in/ व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांच्या मार्फत पीकविमा अर्ज दाखल करता येईल. शेतकऱ्यांना १ रुपया विमा हप्ता भरावा लागेल.

Crop Insurance : रब्बी पिकांचे १५ हजारांवर विमा प्रस्ताव दाखल
Crop Insurance Compensation : पीकविमा परतावा न मिळाल्याने संभ्रम

विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, आधार नोंदणीची प्रत, ७-१२ उतारा, अधिसूचित पिकांचे पेरणी केलेले स्वयंघोषणा पत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, संमतिपत्र, बँक पासबुकची प्रत ही आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि., पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, ई-मेल आयडी customersupportba@icicilombard.com वर ई-मेल करावे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधावा.

सोमवार (ता. ११) पर्यंत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे १५ हजार ३३२ विमाप्रस्ताव दाखल करत २० हजार ३२२ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. उन्हाळी भुईमूग या पिकासाठी विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com