Agriculture University : कृषी विद्यापीठातील रस्ते दुरुस्तीसाठी १४.७५ कोटींचा निधी मंजूर

VNMK University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी मुख्‍यालय येथील रस्‍त्‍यांच्या कामाकरिता १४ कोटी ७५ लाख २६ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे.
VNMK University
VNMK UniversityAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी मुख्‍यालय येथील रस्‍त्‍यांच्या कामाकरिता १४ कोटी ७५ लाख २६ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. त्‍यानुषंगाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८ कोटी रुपये एवढे अनुदान वितरित करण्‍यास शासन मंजुरी दिली आहे.

कृषी विद्यापीठातील रस्त्यांची कामे २००६ ते २००९ दरम्‍यान करण्‍यात आली होती. २०१० नंतर या रस्‍त्‍यांची दुरुस्ती करण्‍यात आलेली नाही. या रस्‍त्‍यांची मालकी ही विद्यापीठाची असल्‍याने दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागांकडून केली जात ना‍हीत.

VNMK University
Farm Road : अमळनेर मतदारसंघात ५० गावांत होणार शेतरस्ते

परभणी कृषी विद्यापीठातील रस्‍त्‍यांच्या दुरवस्थेमुळे शेतकरी, विद्यार्थी, नागरिक व विद्यापीठ कर्मचारी यांना अनेक समस्‍यांना तोंड द्यावे लागत होते. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी पदभार स्‍वीकारल्‍यानंतर रस्‍ते दुरुस्तीबाबत प्राधान्‍य देण्‍याचे ठरविले.

VNMK University
Water Supply Scheme : समांतर जलवाहिनीचा शिल्लक १४५ कोटी निधी त्वरित अदा होणार

गेल्‍या एक वर्षापासून त्यांनी या रस्ते दुरुस्तीसाठी सतत पाठपुरावा केला. विद्यापीठातील रस्‍ते हे विद्यापीठातील मूलभूत सुविधेचा भाग असून या रस्‍त्‍यांची दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्‍यता प्रदान करून निधी उपलब्‍ध करून देण्‍याबाबतचा प्रस्‍ताव विद्यापीठ अभियंता डॉ. दीपक कशाळकर यांनी राज्य शासनास सादर केला होता.

कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दखल घेतल्यानंतर रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी १४ कोटी ७५ लाख २६ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंढे यांचे आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com