
Latur News : जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मोठे, मध्यम व लहान अशा एकूण १४४ प्रकल्पांत सध्या ७० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आठ मध्यम प्रकल्पांत मात्र ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.
उन्हाचे चटके फेब्रुवारीपासूनच बसू लागले आहेत. सध्या तरी पाण्याबाबत फारसा ताण नाही. मात्र मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने उन्हाळ्याचे असणार आहेत. त्यामुळे पाणी मुबलक असले तरी ते जपून वापरण्याची गरज आहे
मसलग्यात १७ टक्केच पाणी
लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी सर्वांत कमी म्हणजे मसलगा (ता. निलंगा) येथील मध्यम प्रकल्पात केवळ १७.२० टक्केच पाणीसाठा राहिला आहे. पावसाळ्यात या प्रकल्पाच्या पाळूला भेगा पडल्याने बरेच पाणी सोडून देण्यात आले होते.
याचा परिणामही आता दिसून येत आहे. त्यानंतर तावरजा ६२.०८ टक्के, रेणापूर ६२.७१, व्हटी ५६.०९, तिरू ५३.७६, देवर्जन ४४.१९, साकोळ ४६.३४, घरणी ६४.४६ टक्के पाणीसाठा राहिला आहे.
लघू प्रकल्पातील साठा ६७ टक्के
जिल्ह्यात १३४ लघू प्रकल्प आहेत. यात २३४.५१ दलघमी एकूण पाणीसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १९९.४२४ दलघमी आहे. याची टक्केवारी ६७.१९ इतकी आहे.
मांजरा, निम्न तेरणात मुबलक साठा
मांजरा व निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मांजरा धरणात सध्या १८७.३०४ दललक्षघनमीटर पाणीसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त साठा १४०.१७४ दलघमी इतका आहे. याची टक्केवारी ७९.२१ इतकी आहे, तर निम्न तेरणा प्रकल्पात सध्या १०७.४४ दलघमी पाणीसाठा राहिला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा ७७.४७३ दलघमी इतका आहे. याची टक्केवारी ८४.९३ इतकी आहे. म्हणजे या दोन मोठ्या प्रकल्पांत ८१.१६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल
सध्या फेब्रुवारी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याचे पंधरा दिवस अजून शिल्लक आहेत. आतापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. दिवसा कडक उन्हाळा जाणवत आहे. मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने कडक उन्हाचा काळ असणार आहे. हे लक्षात घेऊन पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.