Land Acquisition : सोळा गावातील १४३ हेक्टर जमीन संपादन होणार

Roha Agardanda Railway : रोहा-आगरदांडा रेल्वे प्रकल्पाकरिता तालुक्यातील १६ गावातील जवळपास १४३ हेक्टर जमीन संपादन होणार आहे.
Land Acquisition
Land Acquisition Agrowon
Published on
Updated on

Roha News : रोहा-आगरदांडा रेल्वे प्रकल्पाकरिता तालुक्यातील १६ गावातील जवळपास १४३ हेक्टर जमीन संपादन होणार आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रोहा भूमी अभिलेख कार्यालयाच्या खात्यात धनादेशाद्वारे ४५ लाख ५८ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

जमीन मोजणीच्या कामासाठी सरकारी शुल्‍क म्‍हणून इतर वेळी १० ते १५ हजार रुपये जमा होतात, मात्र रेल्वे प्रकल्पामुळे रोह्यातील भूमिअभिलेख कार्यालयाला गणराया पावला असून इतिहासात प्रथमच इतकी मोठी रक्कम मोजणी शुल्‍क स्वरूपात जमा झाले आहे.

Land Acquisition
Land Acquisition : ‘सुरत-चेन्नई’ बाधितांच्या गावठाणालाही शेतीचाच दर

प्रस्ताविक रेल्वे कॉरीडॉर - रोहा जंक्शन ते दिघी पोर्ट नॉर्थ टर्मिनल, आगरदांडा या प्रकल्पासाठी रोहे तालुक्यातील वरसे, वाली, विरझोली, उचेल, ताम्हणशेत, तळाघर, सुखदरवाडी, रोठ खुर्द, निवी, खाजणी, कांढणे खुर्द, कांढणे बु. हाल, भुवनेश्वर, भालगाव व अष्टमी आदी १६ गावातील जवळपास १४३ हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानुसार संपादित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Land Acquisition
Land Acquisition : सुरत-चेन्नई महामार्गासाठीची वैरागमधील जमीन मोजणी पूर्ण

गावांची संख्या निश्चित झाल्यानंतर ज्या परिसरातून रेल्वे जाणार आहे, त्या ठिकाणी बाधित क्षेत्रफळ निश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी उप विभागीय कार्यालयाकडून १८ जुलै २०२३ रोजी एमआयडीसी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले होते.

भूमिअभिलेख कार्यालयाकडून २ ऑगस्ट २०२३ रोजी १६ गावांतील जवळपास १४३ हेक्टर भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली. मोजणी शुल्‍कापोटी ४५ लाख ५८ रुपयांचा धनादेश रोहा भूमिलेख कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com