Crop Insurance: पीकविम्याचे १४०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Farmer Compensation Payout: राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल, अशी माहीती कृषी विभागाने दिली.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रीगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदूरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा,अनुदानाचा निधी खात्यातून वळती करू नका : रविकांत तुपकर

राज्यात यंदा यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला. तर नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे. या तीन जिल्ह्यांमधील १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे.

खरिप २०२४ हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या ४ ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून १ लाख ४८ लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी भरपाई मिळणार आहे.

Crop Insurance
Crop Insurance : नुकसानीपोटी १७९ कोटींवर अग्रिम विमा

विविध बाबीअंतर्गत खरिप २०२४ची भरपाई

१,४५५ कोटी

स्थानिक नैसर्गिक आपत्ती

७०६ कोटी

हंगामातील प्रतिकूल परिस्थिती

१४१ कोटी

काढणी पश्चात नुकसान

१३ कोटी

पीक कापणी प्रयोग आधारित उरलेली रक्कम लवकरच जमा होणार

कृषी विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, १४ एप्रिलपर्यंत राज्यभरात १ हजार ४०० कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. उऱलेल्या ९०८ कोटींपैकी काही रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत आहे. तर उतरेलील रक्कम काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com