Kondhane Dam Project Scam : कोंढाणे धरण प्रकल्पात १४०० कोटींचा घोटाळा

Vijay Wadettiwar : महायुतीची घोटाळ्यांची मालिका अखंड सुरू असून महायुतीने सिडकोच्या पाणीपुरवठा योजनेत कोंढाणे धरण प्रकल्पात १४०० कोटींचा महाघोटाळा केला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीची घोटाळ्यांची मालिका अखंड सुरू असून महायुतीने सिडकोच्या पाणीपुरवठा योजनेत कोंढाणे धरण प्रकल्पात १४०० कोटींचा महाघोटाळा केला आहे. सध्या महायुती मेघा इंजिनिअरिंगवर मेहेरबान आहे. त्यामुळे या कंपनीचा खिसा भरण्यासाठी हा घोटाळा केला असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता. १) केला.

कोंढाणे धरण प्रकल्पातील १४०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. सरकार मेघा इंजिनिअरिंगवर कंत्राटांची खैरात करत आहे. सरकारला लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरून निवडणूक फंड गोळा करण्यात व्यस्त असल्याने शेतकऱ्याकडे पाहायला सरकारला वेळ नाही, असा सवाल, वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Vijay Wadettiwar
Kondhane Dam Scam : कोंढाणे धरणात महायुतीचा १ हजार ४०० कोटींचा घोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘नवी मुंबईतील सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यासाठी कोंढाणे धरण हस्तांतरित करण्यात आले. यासाठी सिडकोने १४०० कोटींची निविदा काढली. यापूर्वी या धरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केली होती.

Vijay Wadettiwar
POCRA Scam : ‘पोकरा’ घोटाळ्यातील अधिकाऱ्याला कारवाईऐवजी बढतीचे बक्षीस

या वेळी मूळ कंत्राटदार काम करण्यास तयार असेल, तर त्याला काम करण्यास सांगितले होते. झालेल्या ३५ टक्के कामासाठी मूळ कंत्राटदाराला १०० कोटी रुपये देण्यात आले. मात्र अचानक साक्षात्कार झाला आणि इथे मातीऐवजी सिमेंट काँक्रीटचे धरण झाले पाहिजे अशी सरकारने भूमिका घेतली. हे धरण आरसीसी करण्याचे कारण काय? लाडक्या कंत्राटदारासाठी धरणाचे स्वरूप का बदलले. याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.’’

‘सगळी कामे मेघा इंजिनिअरिंगकडे’

वडेट्टीवार पुढे म्हणाले, की याच मेघा इंजिनिअरिंगचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कौतुक करतात. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचे काम देखील या कंपनीला दिले आहे. यासाठी झालेल्या कॅबिनेटमध्ये १८ हजार ८३८ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. १४ हजार कोटींवरून १८ हजार कोटी रुपये या प्रकल्पाची किंमत कशी झाली, हा देखील प्रश्‍न आहे. सिंचन, वाहतूक, वीज अशा अनेक क्षेत्रांत कंपनीने आपले हातपाय पसरले आहेत. या कंपनीला नागपूरला कामे दिली आहे. पुणे रिंग रोड, बस निर्मितीसारखी कामे या कंपनीला दिले. इलेक्टोरल बाँड सर्वाधिक खरेदी करणारी ही कंपनी असल्याने सरकारने हे लाड पुरविले आहेत. पुणे रिंग रोड, नागपूर महानगरपालिका, समृद्धी, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा, ईव्ही बस निर्मिती अशी सगळी कामे या कंपनीला देऊन कंपनीवर खैरात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com