
अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani News : परभणी ः परभणी व हिंगोली जिल्ह्यात सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) ११ केंद्रांवर १० लाख २३ हजार ९२१ क्विंटल आणि खासगी केंद्रांवर ४ लाख ७ हजार ८६८ क्विंटल मिळून एकूण १४ लाख ८ हजार ४०९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयकडून किमान आधारभूत किंमत दराने परंतु ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले. खासगी खरेदीचे दर प्रति क्विंटल ६५०० ते कमाल ७२२५ रुपये राहिले.
राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोनअंतर्गत परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, ताडकळस, हिंगोली, वसमत, जवळाबाजार या ११ ठिकाणच्या २० जिनिंग कारखान्यांमध्ये सोमवारपर्यंत (ता. १०) १० लाख
२३ हजार ३९२१ क्विंटल कापूस खरेदी झाली. त्यात परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवरील १७ जिनिंग कारखान्यांमध्ये ८ लाख ८३ हजार १०५ क्विंटल कापूस खरेदी झाली. हिंगोलीतील ३ केंद्रांवर १ लाख ४० हजार ८१६ क्विंटल कापूस खरेदी झाली.
परभणी आणि हिंगोलीतील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत ४४ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून ४ लाख ७ हजार ८६८ क्विंटल कापूस खरेदी झाली. त्यात परभणी जिल्ह्यातील ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये ३ लाख ७७ हजार ६४६ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विटंल किमान ६५०० ते कमाल ७२५० रुपये दर मिळाले.
हिंगोली जिल्ह्यात ५ जिनिंग कारखान्यांमध्ये ३० हजार २२२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७१०० रुपये दराने खरेदी करण्यात आली, अशी माहिती कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली. तांत्रिक अडचणीमुळे मागील आठवडाभरापासून सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे.
परभणी-हिंगोली जिल्हे कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
सीसीआयची खरेदी
केंद्र ठिकाण जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये
परभणी २ ४९,८६४ ७,००० ते ७,२३५
जिंतूर १ १,८४,७३१ ७,१०० ते ७,४२१
बोरी २ १,८४,७३१ ७,१७२ ते ७,४७१
सेलू ५ ९४,७४४ ७,१७२ ते ७,४७१
मानवत ३ २४,३७५६ ७,०४० ते ७,२०५
पाथरी १ २७,६६२ ७,१७२ ते ७,४२१
गंगाखेड २ ८४,२६१ ७,१२४ ते ७,४२१
ताडकळस १ ४९,३९१ ७,२४६ ते ७,४२१
हिंगोली १ ४४,०२३ ७,१२४ ते ७,४२१
वसमत १ २३,३८० ७,१५० ते ७,४७१
जवळा बाजार १ ७३,४१३ ७,१७० ते ७,४४१
खासगी कापूस खरेदी
बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रपये
परभणी ४ ६,६९,२३८ ७,१३० ते ७,२२५
जिंतूर ४ ११,५६५ ६,५०० ते ६,९००
बोरी १ ३,५५४ ६,९०० ते ७,१००
सेलू ६ ४१,८६० ७,०४० ते ७,२०५
मानवत १३ १,४२,४३६ ७,०६० ते ७,२२५
पाथरी २ १७,६८९ ६,८५० ते ७,०५०
सोनपेठ १ २८,१६० ७,००० ते ७,२००
गंगाखेड ६ ४,००५ ७,०७५ते ७,३००
ताडकळस २ ८,९४४ ७,००० ते ७,१५०
हिंगोली ४ २७,१५० ६,८०० ते ७,१००
जवळा बाजार १ ३,०७२ ६,९०० ते ७,१००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.