Farmer Accident Insurance : अपघात विम्यापासून शेतकरी वंचित

Farmer Welfare Scheme : शेतकऱ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते.
Farmer Accident Insurance
Farmer Accident Insurance Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : शेतकऱ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. वर्ष २०२४-२५ मध्ये या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या एकूण प्रस्तावांपैकी ३१५ प्रस्ताव निधी अभावी रखडले आहेत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जावर संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाइकास दोन लाख रुपयांची मदत देण्यात येते. विजेचा धोका, रस्ते अपघात, वीज, पूर, सर्पदंश, विंचू दंश वाहन अपघात यासारख्या आपत्तींमुळे अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास दोन लाखांची मदत देण्यात येते.

Farmer Accident Insurance
Farmer Accident Insurance : ‘अपघात विम्या’चा ६६ शेतकऱ्यांना लाभ

अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर वाईट परिस्थिती निर्माण होऊन त्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अशाप्रकारच्या परिस्थितीत मदतीचा भक्कम आधार मिळावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य, आई-वडील, शेतकऱ्याचे पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी, १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण २ व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एकीकडे शेतकऱ्यांची काळजी असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे त्यांना लाभ देण्यात टाळाटाळ होत असल्याचे दिसते.

Farmer Accident Insurance
Farmer Accidents Insurance : अमरावती जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांचा अपघातांत मृत्यू

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनाचा ३०० वर शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. वर्ष २०२४-२५ साठी १२२६ अर्ज आले. यातील ८३१ अर्जांना मंजुरी देण्यात आली. तर १५५ अर्ज नामंजूर करण्यात आले असून, ५१६ जणांना लाभदेण्यात आला. ३९५ अर्ज प्रलंबित असून आर्थिक वर्ष मार्च संपुष्टात येऊनही ३१५ जणांना मदत निधीच वितरित करण्यात आलेला नाही.

जिल्हा प्राप्त प्रस्ताव मंजूर प्रस्ताव नामंजूर

प्रस्ताव मार्च अखेरपर्यंत लाभ दिलेले प्रस्ताव

नागपूर १७६ ११५ २१ ६८

भंडारा १८३ १२४ १६ ८१

गोंदिया २३७ १६० ३३ १०३

चंद्रपूर २८४ १८१ ४७ ८८

गडचिरोली १८५ १३६ १५ १०८

वर्धा १६१ ११५ २३ ६८

एकूण १२२६ ८३१ १५५ ५१६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com